Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केली मांगेली धबधब्याला पाहणी!

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केली मांगेली धबधब्याला पाहणी!

177

दोडामार्ग: जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस व पर्यटन स्थळी होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी शनिवारी दोडामार्ग तालुक्यातील मांगेली धबधबा व तिलारी धरण येथील पर्यटन स्थळी भेट देत पाहणी करीत आढावा घेत आवश्यक त्या सुचना केल्या. यावेळी सावंतवाडीच्या डिवायएसपी संध्या गावडे तसेच इतर पोलिस अधिकारी, दोडामार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.मांगेली धबधबा या ठिकाणी पाहणी करून आढावा घेतला.