Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने सावंतवाडी व दोडामार्गया दोन तालुक्यातील गाव ग्रंथालय...

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने सावंतवाडी व दोडामार्गया दोन तालुक्यातील गाव ग्रंथालय पाहणी दौऱ्याचे आयोजन.

47

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने सावंतवाडी व दोडामार्गया दोन तालुक्यातील गाव ग्रंथालय पाहणी दौरा चा दुसरा टप्पा उद्या २२ डिसेंबर ला केला जात आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे. येथे सकाळी नऊ वाजल्यापासून हा दौरा सुरू होणार आहे. त्यानंतर झोळंबे, कळणे, डिंगणे, बांदा, मडुरा, साताड, आरोंदा,  गुळदुवे, आजगाव, तळवडे, नेमळे अशा १२ ग्रंथालयांना भेटी दिल्या जाणार आहेत.

या ग्रंथालय भेटीमध्ये जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव राजन पांचाळ व जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी गाव ग्रंथालय भेटीवेळी ग्रंथालय कर्मचारी व संचालक मंडळाने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे