सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार तथा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष. ॲड संतोष सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रंथालय साहित्य चळवळीत गेली वीस वर्षाहून अधिक काळ ते काम करत आहेत. ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय चे माजी सचिव आणि आता संचालक म्हणून कार्यरत आहेत ग्रंथालय चळवळीचे नेते माजी आमदार जयंत मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ग्रंथालय चळवळीत सहभाग घेतला आहे. त्यांची संस्था विभागातून संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे ते खजिनदार आहेत तसेच कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष म्हणून ते साहित्य व ग्रंथालय चळवळ व मराठी भाषा टिकवण्याच्या दृष्टीने ते विविध उपक्रम तालुकास्तरावर घेत आहेत. सह्याद्री फाउंडेशन चे कार्यवाह म्हणून काम करत आहेत. विविध सामाजिक साहित्य ग्रंथालय आणि पत्रकारिता क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे जिल्हा ग्रंथालय संघावर एकूण २१ जणांचे बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्यातून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव व कवी विठ्ठल कदम, कोकण मराठी साहित्य परिषदेचे खजिनदार तथा नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, यांची निवडी झाली आहे. श्री कदम व श्री गावडे हे साहित्य व ग्रंथालय चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आनंद वैद्य व सचिव मंगेश मस्के यांचीही निरोध निवड झाली आहे. आधी २१ जणांचा त्यात समावेश आहे.
या निवडीबद्दल श्री ॲड संतोष सावंत म्हणाले की, जिल्हा ग्रंथालय संघावर आपली संचालक म्हणून निवड झाली यामध्ये सावंतवाडी तालुक्याचे यात मोठा सहभाग आहे. खऱ्या अर्थाने तालुक्याला हे प्रतिनिधित्व मिळाले आहे. कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय चे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ यांचे सहकार्य आणि त्याचबरोबर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आनंद वैद्य व सचिव आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, विठ्ठल कदम, भरत गावडे, सुभाष गोवेकर या सर्वांच्या नेतृत्वाखाली मलाही संधी मिळाली आहे.निश्चितपणे त्यांना अपेक्षित असलेले काम केले जाईल.