सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक पदी २१ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यात सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार तथा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष.ॲड संतोष सावंत तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव व कवी विठ्ठल कदम, कोकण मराठी साहित्य परिषदेचे खजिनदार तथा नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जिल्हा ग्रंथालय संघ कुडाळ येथे आहे १५ ऑक्टोंबर ला ही निवड जिल्हा वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली एकूण २१ संचालक यांची निवड करण्यात आली आहे. त्यात जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष अनंतवैद सचिव मंगेश मस्के, कवी रोजारिओ पिंटो, श्री राजन पांचाळ, श्री संजय शिंदे, श्री संजय वेतुरेकर, नंदन वेंगुर्लेकर आदींची निवड झाली आहे.
साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा ग्रंथालय संघावर संचालक म्हणून निवड झाली आहे. संचालक पदी निवड झालेली आहे तिन्ही संचालक गेली १५ ते २० वर्ष ग्रंथालय चळवळीत काम करत आहेत. ग्रंथालय चळवळ वाढीच्या दृष्टीने त्यांचे योगदान आहे. ग्रंथालय चळवळ व साहित्य चळवळ मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. येत्या २२ ऑक्टोबरला जिल्हा ग्रंथालय संघाच्या जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीत पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहेत.