Home क्राईम सिंधुदुर्गात पोलीस भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणार्‍या दोघांवर गुन्हा नोंद

सिंधुदुर्गात पोलीस भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणार्‍या दोघांवर गुन्हा नोंद

136

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २०२१ मध्ये बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणारे २ उमेदवार आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.ही भरती प्रक्रिया नोव्हेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीमध्ये राबवण्यात आली. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांकडून प्राप्त झालेली कागदपत्रे छाननी करून त्याची सत्यता पडताळणी करण्याकरता संबंधित विभागांकडे पाठवण्यात आली. या वेळी लातूर आणि बीड या जिल्ह्यांतील एकूण २ उमेदवारांनी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले.या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार उमेदवार ज्ञानेश्‍वर भाऊसाहेब सातपुते (रहाणार शिरूर कासार, जिल्हा बीड) आणि कृष्णा राजेंद्र राचमले (रहाणार अहमदपूर, जिल्हा लातूर) यांच्यासह त्यांना साहाय्य करणार्‍यांवर फौजदारी प्रक्रियेच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपींच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.