Home स्टोरी सिंधुदुर्गातील रुग्णाना चांगली वैद्यकीय सेवा न मिळाल्यास डीनच्या कार्यालयाला टाळे ठोकणार! राष्ट्रवादी...

सिंधुदुर्गातील रुग्णाना चांगली वैद्यकीय सेवा न मिळाल्यास डीनच्या कार्यालयाला टाळे ठोकणार! राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत

44

सिंधुदुर्ग: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पूर्णतः दुर्लक्ष केला आहे. त्यांना कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र याशिवाय काही दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खालावण्यास मंत्री हसन मुश्रीफ जबाबदार असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. तसेच या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना सेवा मिळत नसल्यास ते बंद करण्यात यावे असे सांगतानाच या रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास मेडिकल कॉलेज च्या डीन कार्यालयाला टाळे ठोकणार आल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील गैरकारभार, अस्वच्छता, रुग्णांना मिळत नसलेल्या सेवा, रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण आदी विविध मुद्यांवर आज राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनीता रामानंद यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी भास्कर परब, बाळ कण्याळकर, प्रतीक सावंत आदि उपस्थित होते.