बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा तर्फे महिला मेळावा संपन्न
पाककला स्पर्धेत अर्चना धुत्रे तर श्वेता माळवदे पैठणीच्या मानकरी.
मसुरे प्रतिनिधी: बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला मेळावा तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना उद्योजिका व रोटरीयन रश्मी पाटील म्हणाल्या, आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येक महिलेने विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन ते अधिकाधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या क्षमतेप्रमाणे सर्वानी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा असेही आवाहन त्यांनी केले. स्वरा अर्जून पेंडूरकर हिने सुंदर तबला वादन केले. सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यानी जिद्द असेल तर महिला काय करू शकतात हे स्वराने सर्वाना दाखवून दिले आहे. आठवीत असणारी स्वरा प्रामुख्याने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या तबला वादन क्षेत्रात किती लिलया कला सादर करते हे फारच कौतुकास्पद आहे. याचाही सर्व महिलानी आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी स्वरा पेंडूरकर, गीता नाईक, गिरीजा गावडे, ईशा ताम्हणकर, सुजाता पावसकर यानी भक्ती गीते व भावगीते म्हटली. यावेळी मोड आलेले धान्य या घटकावरील पाककला स्पर्धा संपन्न झाली.
प्रथम क्रमांक अर्चना धुत्रे, द्वितीय क्रमांक – स्वाती पोखरणकर, तृतीय क्रमांक – वृषाली मालवणकर, उत्तेजनार्थ- अमिता माळवदे, उतेजनार्थ- दीक्षा रेवडेकर.
खेळ पैठणीचा या बहरदार कार्यक्रमाचे नियोजन आचरा येथील विनिता कांबळी, कल्पना ढेकणे, भावना मुणगेकर, वीणा ढेकणे, स्वप्नील चव्हाण, किरण ढेकणे, नितीन पेडणेकर, नूर्वी शेडगे यांनी केले. या स्पर्धेत प्रथम पैठणीची मानकरी श्वेता मालवदे, द्वितीय पैठणीची मानकरी सायली बोडये, व तृतीय पैठणीची मानकरी रिया झोरे ठरल्या. मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
पाककलेचे परीक्षण आरती कांबळी व मधुरा माडये यांनी केले. वैष्णवी लाड यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. पैठणी राधा पाटील रश्मी पाटील व गीता नाईक यानी व भेटवस्तू दर्शन म्हाडगुत यानी प्रायोजित केल्या होत्या. दोन दिवस साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, रश्मी पाटील, दीपक भोगटे, दर्शन म्हाडगुत, सुजाता पावसकर, अर्जून पेंडूरकर,रविना पांजरी, रमेश म्हाडगुत, गीता नाईक, वैष्णवी लाड, बाळकृष्ण गोंधळी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.