जिल्हावासियांनी वेळीच सावध होण्याची गरज, मनसे स्थानिकांच्या भक्कम पाठीशी राहणार…!
कुडाळ: सिंधुदुर्गात बंजारा समाज कुठे आहे? या परप्रांतीय बंजारा समाजाला एकत्रित करून भाजपा नेते जिल्हावासियांना काय संदेश देवू इच्छित आहेत.?, असे एक ना अनेक प्रश्न कुडाळ मध्ये झालेल्या बंजारा समाज मेळाव्याच्या निमित्ताने सुज्ञ नागरीकांच्या मनात उपस्थित होत आहेत. परप्रांतीयांना पाठबळ देणे ही जिल्ह्यातील स्थानिकांना धोक्याची घंटा आहे.त्यामुळे स्थानिक खास करून मराठी माणसांच्या रक्षणासाठी मनसे खंबीरपणे उभी राहणार आहे, असे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी म्हटले आहे.
श्री. परब पुढे म्हणले, भाजपने जो मेळावा कुडाळ येथे घेतला तो बंजारा समाज हा महाराष्ट्रातील नसुन पर राज्यातील आहे त्यांना खूप वर्षापासून लमाणी असेल देखील संबोधले जाते. हा समाज आज या ठिकाणी ठेकेदारी लेबर, बांधकाम मजुरी ,गवंडीकाम, प्लास्टर काम ,भाजी विक्री ,मासे विक्री ,डंपर जेसीबी ऑपरेटर, मुकादमगिरी ,ट्रॅक्टर /यारी चालवणे ,सेंट्रींग ,हमाली अशा प्रकारची कामे आपल्या रोजंदारीसाठी करतो. अशा एखादा परप्रांतीय समुदाय येथील शासकीय योजनांमध्ये सामावून घेणे, उद्योग व्यवसायात सामावून घेणे ,म्हणजे येथील शासकीय योजनांमध्ये लाभार्थी संख्या वाढवणे. स्थानिकांच्या रोजगारात भागीदार, स्पर्धक निर्माण करण्यासारखे आहे .मुळात हे सर्व परप्रांतीय लोक येथील मतदार नाहीत. पण त्यांना मेळाव्यात आम्ही सर्वस्वी पाठबळ देतो. तुम्ही उद्या काही करा तुमचा कोण काही करू शकत नाही. असा विश्वास देवुन पाठबळ देणे म्हणजे आपल्या स्थानिक माणसांच्या पोटावर लाथ मारण्यासारखे आहे . हे सर्व परप्रांतीय लोक चार-पाच समाजाच्या म्होरक्या पुढाऱ्यामुळे एकत्र जमले होते. त्यांना आपण आपले गाव या ठिकाणी वसवुया, याच ठिकाणी रेशन कार्ड, आधार कार्ड ,मतदान कार्ड बनवून घेऊया, समाज संतांचे मंदिर बांधूया, संघटित होऊया उद्योग व्यवसायात सदन होऊया, मग येथे स्थानिक व्यावसायिक उद्योजक आपलं काहीच करू शकत नाही. असे सांगून जमवले होते.या मेळाव्यात न येणाऱ्यास आर्थिक भुर्दंड समाजाला द्यावा लागेल. असा फतवा सुध्दा या पुढाऱ्यांचा होता. याआधी बरेच मुकादम,लेबर येथील स्थानिक कंत्राटदारांचे ऍडव्हान्स साठी पैसे घेऊन गायब झालेले आहेत. आणि त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. भविष्यात अशा पाठबळामुळे या परप्रांतीय लोकांना स्थानिकांना फसवून आपले कोण काय करू शकत नाही असे वाटेल .त्याच प्रमाणे येथील रोजगाराच्या संधी यांच्या घशात जातील.आज समाज — समाज न्याय हक्कासाठी महाराष्ट्रात भांडत आहेत .त्यात अशा परप्रांतीय समुदायांना संरक्षण देऊन त्यांच्यासाठी पाठबळ देणे. कितपत योग्य आहे ? जिल्ह्यातील युवक ,ट्रक, ट्रॅक्टर जेसीबी, ठेकेदारी व्यवसायात कर्ज काढून उतरत आहेत, त्यात त्यांच्या सोबत त्यांचे संघर्ष होत आहेत. मालवण कुडाळ मध्ये स्थानिक विरुद्ध परप्रांतीय व्यावसायिकांची मारामारी पर्यंत विषय गेलेत. भविष्यात अशा समुदायाचे ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, मोठे उद्योजक बनले तर आपण त्यांच्याकडे विकासासाठी आणि रोजगारासाठी उपेक्षिताप्रमाणे बघणार का? असा सवाल आता स्थानिकांनी विचारणं आवश्यक आहे. या विषयावर स्थानिक व्यावसायिकांनी मनसेकडे भविष्यात होणाऱ्या अडचणी संदर्भात व्यथा मांडल्या आहेत,त्यामुळे किती काही झाले तरी मनसे स्थानिक उद्योजक, व्यावसायिक, हमाल गवंडी ,जेसीबी मालक, ट्रॅक्टर मालक, यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणार आहे. प्रसंगी काही होवो स्थानिकांचा रोजगार, शासकीय लाभांमध्ये भागीदार, आणि उद्योग व्यवसायामध्ये संघटित होऊन दादागिरी करुन स्थानिकांना त्रास देण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर मनसे रस्त्यावर उतरून प्रसंगी कायदा हातात घेऊन जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज असेल हे निश्चित!, असे धीरज परब यांनी म्हटले आहे.