सावंतवाडी प्रतिनिधी: घे भरारी फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष, भाजपच्या सावंतवाडी शहर महिला अध्यक्ष मोहिनी मडगांवकर यांचा आज वाढदिवस सामाजिक उपक्रम द्वारे साजरा करण्यात आला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा व मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात जवळपास दहा जणांनी रक्तदान केले. यावेळी सौ. मडगावकर यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.विविध संस्था, राजकीय, सामाजिक, मित्र मंडळ आधी नी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी रक्तदान शिबिरातील रक्तदान केलेल्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मोहिनी मडगांवकर रक्त मित्र प्रतिष्ठानचे सचिव बाबली गवंडे, सिद्धार्थ पराडकर, शारदा गुरव, मेघना साळगावकर, अमोल गावकर, समीर नेमळेकर, नीलू देसाई, राकेश पाटकर, ऋत्विक पाटकर, डॉक्टर अनिकेत गुरव, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अमृता मुंगी, एम.एन. वारखणकर आधी उपस्थित होते.