सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील शालेय परिसराच्या १०० मीटर बाजूस असलेले मटक्याचे स्टॉल्स व दारू विक्री हे उघडपणे होत असल्याने शालेय विद्यार्थी तसेच युवा पिढी याच्या आहारी जाऊन नुकसान करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे या संबंधित मुलांच्या पालकांच्या तक्रारी येत असून त्यांच्या बॅगमध्ये सापडले जाणारे मटक्याचे चिट्टे या संबंधित मटक्याचे स्टॉलवर कारवाई व्हावी. यासंबंधीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पोलीस प्रशासनाकडे लेखी पत्रकाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसे निवेदन आज सावंतवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना देण्यात आले आहे. संबंधित स्टॉल वरती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक भूमिका घेईल. याबाबत लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल. मटका आणि दारू विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे आश्वाशन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी मनसे पदाधिकारी केतन सावंत आणि मनसे कार्यकर्त्यांना दिले.