Home स्टोरी सावंतवाडी शहरात जीवित वित्तहानी कारणीभूत ठरणारी झाडे तोडण्याची मोहीम थंडावली….!

सावंतवाडी शहरात जीवित वित्तहानी कारणीभूत ठरणारी झाडे तोडण्याची मोहीम थंडावली….!

255

सावंतवाडी: शहरात सप्टेंबर २०२३ मध्ये गणेश चतुर्थीच्या कालावधीत भजन सेवा करून रात्री घरी जाताना येथील राजवाडा जवळ असलेले एक मोठे झाड अंगावर फोडून दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर अनेक सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते पक्ष संघटनांनी प्रशासनाला जबाबदार धरून आंदोलने केली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून सावंतवाडी नगरपरिषद वनविभाग महसूल विभाग यांनी संयुक्तपणे वित्तहानी कारणीभूत ठरणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण करून ती तोडण्यास प्रारंभ केला यावेळी नागरिकांनी प्रशासनाचे अभिनंदनही केले. परंतु सद्यस्थितीत ही झाडे तोडण्याची मोहीम प्रशासनाने थांबवल्यामुळे शहरातील पंचम खेमराज महाविद्यालय च्या मुख्य दरवाजासमोर एक भला मोठा ताडमाड सुकलेला आहे. त्याची जावळे पूर्णपणे सुकून गेली असून खाली वाकलेली आहेत. शाळा व कॉलेज ची मुले या दरवाजातून त्या झाडाजवळून ये जा करत असतात. तेथे फार मोठ्या प्रमाणात इतर लोकांची वर्दळ पण असते झाडा जवळून विद्युत भरीत वाहिन्याही गेलेले आहे जीर्ण झालेली जावळे विद्युत वाहिन्यावर पडल्यास येणाऱ्या जाणाऱ्या च्या अंगावर पडू शकतात. जीवित आणि वित्त टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जीवितास धोका असणारी झाडे युद्ध प्रार्थना तोडण्यास पुन्हा प्रारंभ करावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे