सावंतवाडी: मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच मराठा समाज नेते मनोज जरंगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी आरक्षणासाठी पुकारलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सावंतवाडी तालुका मराठा समाज यांच्यावतीने सावंतवाडी शहरातून दुचाकी वरून रॅली काढण्यात आली. ह्या रॅली ची सुरुवात सावंतवाडी राजवाडा येथून झाली. हि रॅली मध्ये सावंतवाडी शहरासह विविध गावातील मराठा समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासून परतीच्या पावसाने जोर धरला होता तरीसुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या आणि बाईकला भगवे झेंडे लावून ह्या रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा.. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे.. जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणानी सावंतवाडी शहर दुमदुमून गेले ह्या रॅली ची सांगता सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाजवळ करण्यात आली. यावेळी मराठा जमाजाच्या आरक्षण विषयी मागणायचे निवेदन येथील तहसीलदार श्रीधर पाटील यांना देण्यात आले.
ह्या रॅली मध्ये तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, युवराज लखमराजे भोसले, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे परब, संजू परब, रुपेश राऊळ, अपर्णा कोठवळे, बाबू कुडतरकर यासह तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.