सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील मच्छि मार्केट जवळ रोज सकाळी काही व्यापारी मस्यांच्या लिलावासाठी बसतात. मास्यांचा लिलाव लावल्यानंतर मास्यांच्या ट्रे मधील दुर्गंधी येणार पाणी त्या ठिकाणी रस्त्यावरच वस्ताव ओततात. सकाळच्या वेळेस रस्त्यावर मस्यांच्या ट्रे मधील पाणी ओतल्यामुळे रस्त्यावरून येजा करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच सावंतवाडी मच्छी मार्केटच्या अगदी जवळच कळसुलकर हायस्कूल आहे. हायस्कूल मध्ये ये जा करणाऱ्या मुलांना या घान पाण्यातून जावं लागतं तसेच या पाण्याची दुर्गंधी सहन करावी लागते.
सध्या सावंतवाडी शहरात अनेक समस्या आहेत. यामध्ये मोकाट कुत्रे, मोकाट गुरे, मोकाट कुत्र्यांमुळे होणारी घाण याचा सध्या सावंतवाडीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सावंतवाडी शहरात काही ठिकाणी तर काही कुत्रे जखमी अवस्थेत आणि किडे पडलेल्या अवस्थेत दिसत आहेत. यामुळे कोणत्याही वाईट घटना घडू शकतात आणि रोगराई पसरू शकते हे नाकारता येणार नाही. याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष आहे असे दिसून येते. असे असतांना सावंतवाडी मच्छी मार्केट जवळ काही मच्छि विक्रेते अशा पद्धतीने चुकीचं काम करत असल्यामुळे त्याचाही अधिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. तसेच शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागतो. ऊन पडल्यानंतर हे मस्यांच्या ट्रे मधील दुर्गंधीयुक्त पाणी जे रस्त्यावर ओतले त्या पाण्याचा ऊन पडल्यानंतर दुर्गंध सर्वत्र पसरतो. हे सर्व काही रस्त्यावर घडत असतांना, तसेच शाळेच्या जवळ घडत असतांना, नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतांना प्रशासकीय अधिकारी गप्प का? असा प्रश्न उपस्थित होतो.