सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात दहा दिवसांपूर्वी सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या लेडीज सिंघम माधुरी मुळीक यांनी काही मटका अर्थात जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकत धडाकेबाज कारवाई केली. मटका घेणारे आणि मटका लावणारे अशा संबंधित व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र आता त्या ठिकाणी पुन्हा मटका व्यवसाय सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा मटका व्यवसाय बंद करणं किंवा जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकणं हा फक्त पोलिसांना हप्ता मिळण्यासाठी किंवा मिळत असलेला हप्ता वाढवण्यासाठी केलेलं हे कर्मकांड होतं काय? अशी चर्चा सर्व सुरू आहे. कारण काही दिवसांपूर्वी सावंतवाडीतील मटका व्यवसाय बंद झाला पाहिजे, तसेच सावंतवाडीतील सर्व बेकायदेशीर धंदे बंद झाले पाहिजेत अशी बोंब सावंतवाडीत एक वरिष्ठ स्वयंघोषित दाढीवाला पत्रकार घालत होता. हा दाढीवाला स्वयंघोषित बोगस पत्रकार नियमित बेकायदेशीर धंद्यांच्या विरोधात बोंबलत असतो. मात्र काही काळानंतर हा दाढीवाला स्वयंघोषित पत्रकार शांत होतो. हा दाढीवाला स्वयंघोषित पत्रकार फक्त शांत होत नाही. तर नंतर हाच पत्रकार बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांच्या आजूबाजूला तळमळत असतानाही दिसतो. मग हे सर्व काही वाईट धंदे बंद करण्यासाठी चालू असलेले प्रयत्न आहेत की, दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना दमदाटी करून स्वतःचे पोट भरण्यासाठी हे सर्व सुरु आहे? असा प्रश्न निर्माण होतो.
हा स्वयंघोषित दाढीवाला पत्रकार कित्येक वेळा बोंब घालतो आणि आणि पत्रकारितेच्या धंद्याखाली नंगा नाच करत समाजातील वातावरण घाण करतो. हे कित्येक राजकीय लोकांच्या तसेच काही व्यवसायिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे समाजाने आता त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु या दाढीवाल्या बोगस पत्रकाराचे ऐकून सावंतवाडीतील पोलीस त्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी पुढे येतात. तसेच काही काळापुरते धंदे बंद करतात आणि पुन्हा त्या ठिकाणी तेच धंदे सुरळीत राहतात, त्यामुळे पोलीसांचा यामध्ये काही हस्तक्षेप आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच हे पोलीस प्रशासनाला लाजस्पद आहे.
या दाढीवाल्या स्वयंघोषित पत्रकारासारखे पत्रकार जे सावंतवाडी सारख्या संस्थानिक सुशिक्षित लोकांच्या शहरात स्वतः पत्रकार म्हणून फिरत आहेत. मोठमोठ्या पत्रकार परिषद जॉईन करत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे तसेच राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष आहे. असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदेव्यवस्था सुरळीत चालू आहे काय? असा प्रश्न निर्माण होतो. संबंधित स्वयंघोषित दाढीवाला पत्रकार मोबाईल पत्रकारिता करत असल्याची माहिती मिळते. या पत्रकाराकडे कोणत्याही प्रकारचा अधिकृत पत्रकार असल्याचा पुरावा नाही. तरी हा व्यक्ती पत्रकार परिषद कसा जॉईन करतो? असा प्रश्न उपस्थित होतो. मोबाईल पत्रकारिता करत असताना स्वतःचा फोटो टाकून जास्तीत जास्त बातम्या प्रसारित करणं, वेगवेगळ्या पदांबाबत स्वतःची माहिती समाजात सोशल मीडिया द्वारा पसरवणे, तसेच वेगवेगळ्या तहसीलदार कार्यालय तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना आंदोलन करणार असल्याचे निवेदन देणं आणि नंतर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या म्हणून आंदोलन आपण मागे घेत असल्याची माहिती स्वतःच्या मोबाईल पत्रकारितेद्वारे प्रसारित करणं, याचा नेमका अर्थ काय होतो? आंदोलन करण्याची धमकी देऊन वाईट चुकीचे धंदे करणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊनच नंतर आंदोलन कारण्याचा निर्णय मागे घेतला जातो काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कित्येक वेळा अधिकाऱ्यांना काही धंदे बंद करा नाहीतर मी आंदोलन करणार असे निवेदन देऊन आंदोलन करणार अशी घोषणाबाजी आपल्या मोबाईल पत्रकारितेद्वारे हा बोगस पत्रकार करत असतो. आणि अचानक काही दिवसानंतर हा बोगस पत्रकार कोणतेही आंदोलन करत नाही. आजपर्यंत या बोगस पत्रकाराने तसं कोणतहि आंदोलन न केल्याचं दिसत आहे. मग कदाचित हा बोगस पत्रकार आंदोलन करणार अशा अधिकाऱ्यांना धमक्या देऊन वाईट धंदे करणाऱ्यांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळतो का किंवा हप्ते खातो काय? पत्रकारितेचा गैरवापर करतो काय? याकडे आता प्रशासनाने तसेच समाजातील लोकप्रतिनिधींनी, पात्रकारांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या धडाकेबाज लेडीज पोलीस अधिकारी माधुरी मुळीक यांनी चतुर्थीपूर्वी जे मटके व्यवसाय बंद केले ते मटके व्यवसाय पुन्हा का सुरू आहेत. याबाबत सुद्धा सावंतवाडी पोलिसांनी योग्य तो खुलासा करणे गरजेचे आहे. अन्यथा सर्वसामान्य लोकांचा पोलिसांवरील विश्वास आता उडतांना दिसत आहे. जे व्यवसाय तुम्ही बंद केले ते व्यवसाय पुन्हा त्याच ठिकाणी कसे सुरु झाले याबाबत पोलिसांनी योग्य तो खुलासा करणे गरजेचे आहे कारण ती पोलिसांची सामाजिक बांधिलकी आहे हे पोलिसांनी लक्षात घेऊन काम केले पाहिजे. पोलीस कुणाच्या दबावाखाली येऊन काम करत आहेत काय? असे प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.
दारू व्यवसाय, वेश्याव्यवसाय, मटका व्यवसाय, गांजा व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यक्तींवर पोलीस कारवाई करतात. पण काही काळानंतर तेच व्यवसाय पुन्हा जोरात सुरू असतात. मग पोलीस या लोकांवर फक्त स्वतःचे हप्ते वाढवण्यासाठी कारवाई करतात काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात उपस्थित होत आहे. आणि असं असेल तर ह्यापेक्षा लाजिरवांणा प्रकार दुसरा कोणता नाही. कारण कुंपणच जर शेत खात असेल तर पुढे जिल्ह्याचे भविष्य काय असेल हे समजून घेण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडे,, जिल्हा प्रशासनाकडे जिल्ह्यात कार्यरत असणारे पत्रकार कोण? आणि बोगस पत्रकार कोण? याची यादी असणे गरजेचे आहे.
सावंतवाडी पोलीस स्टेशनला संध्याकाळी काही बोगस पत्रकार जाऊन क्राईम बाबत न्यूज गोळा करून त्या न्यूज सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र पोलीस संबंधित पत्रकार हा खरंच अधिकृत पत्रकार आहे काय? कि संबंधित पत्रकार हा बोगस पत्रकार आहे? याबाबत कोणतीही चौकशी न करतांना दिसून येत आहे. सावंतवाडी पोलीस स्टेशन तसेच जिल्हा प्रशासनाकडे अधिकृत पत्रकारांची यादी असणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांने स्वतःच्या कार्यालयात आलेल्या पत्रकाराची योग्य ती चौकशी करणे गरजेचे आहे. पण तसं न होतांना दिसत आहे.
दिवसेंदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत आहेत. विशेषता सावंतवाडी मध्ये जास्तीत जास्त बोगस पत्रकारांची संख्या वाढत आहेत आणि हे बोगस पत्रकार चुकीच्या धंद्यांना चालना देत आहेत. यामुळे लोकसभेच्या चौथ्या स्तंभात गोंधळ निर्माण झालेला आहे हे सिद्ध होतं. आत्ताच राजकारणात प्रवेश केलेले काही व्यक्ती स्वतःला प्रसिद्धी देण्यासाठी अशा बोगस पत्रकारांची कोणतीहि चौकशी न करता स्वतःच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धीस आणण्यासाठी या पण पत्रकारांना हाताशी धरतात आणि किरकोळ हजार, पाचशे रुपये देऊन स्वतःच्या बातम्या प्रसारित करतात. त्यामुळे पत्रकारिता कुठेतरी बदनाम होत आहे. हे विसरून चालणार नाही. याबाबत जिल्हातील अधिकृत पत्रकारांनी वेळीच योग्य ते पाऊल उचललं नाही तर जिल्ह्यातील पत्रकारिता धोक्यात येऊ शकते किंवा जिल्ह्यातील पत्रकारिता बदनाम होऊ शकते हे नाकारता येणार नाही.







