Home क्राईम सावंतवाडी शहरातील गार्डन परिसरात तरुण-तरुणींच्या वाढत्या अश्लील चाळ्यांमुळे नागरिक हैराण..!

सावंतवाडी शहरातील गार्डन परिसरात तरुण-तरुणींच्या वाढत्या अश्लील चाळ्यांमुळे नागरिक हैराण..!

337

सावंतवाडी: सावंतवाडी एक सुशिक्षित सुसंस्कृत आणि जागृत लोकांचे शहर आहे. सावंतवाडी शहरात सर्व प्रकारच्या सुविधा असल्यामुळे सावंतवाडी शहराच्या आजूबाजूच्या गावातील, पंचक्रोशीतील लोकं या ठिकाणी व्यवसायासाठी,  मुलांच्या शिक्षणासाठी राहत आहेत.  कामातून वेळ वेळ मिळाल्यानंतर सावंतवाडीचतील नागरिका सावंतवाडी येथील नगरपालिका गार्डनमध्ये  सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी जात असतात. काही व्यक्ती संध्याकाळी याच गार्डनमध्ये खेळण्यासाठी नेत असतात.

असं असतांना गेल्या काही महिन्यांपासून या गार्डनमध्ये कॉलेजमधील युवक युवती तसेच इतर तरुण-तरुणी या ठिकाणी उघडपणे बिनधास्त अश्लील चाळे करत असल्याचे दिसून येत आहे. या तरुण-तरुणी आपल्या मर्यादा ओलांडून खुलेआम अश्लील चाळे कररतात. वरिष्ठ नागरिकांना तसेच लहान मुलांना हे लाजस्पद वाटत असल्यामुळे  गार्डनमध्ये वरिष्ठ नागरिकांना फिरणं तसेच लहान मुलांना नेणं आणि फिरवणं हे खूप कठीण झालं आहे. काही व्यक्ती गार्डनमध्ये फिरायला गेले असताना किंवा काही व्यक्ती आपल्या लहान मुलांना घेऊन गार्डनमध्ये गेले असता त्या ठिकाणाहून असे घाणेरडे प्रकार बघून तिथून निघून येतात. साहजिकच असे प्रकार बघून लहान मुलांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकते हे नाकारता येणार नाही. त्यामुळेच तरुण-तरुणी असे अश्लील चाळे करत असताना तेथून गार्डन मधून पालक आपल्या मुलांना घेऊन घरी जाणं योग्य मानतात.

सावंतवाडीतील गार्डन हे संध्याकाळी मोकळेपणाने फिरण्यासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे मात्र अशा तरुण-तरुणींच्या विकृत आणि घाणेरड्या प्रकारांमुळे सध्या सावंतवाडी गार्डनमध्ये सामान्य माणसाला फिरणं मुश्किल झालं आहे. या सर्व प्रकारावर आता नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांनी योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे. हे प्रकार आणखी वाढत गेले तर पुढे जाऊन या ठिकाणी वरिष्ठ नागरिकांना तसेच लहान मुलांना जाणं किंवा फिरणं शक्य होणार नाही. याचा विचार प्रशासनाने वेळीच करणे गरजेचे आहे. असं न केल्यास सावंतवाडी गार्डन हा एक तरुण-तरुणींसाठी अश्लील चाळे करण्याचा अड्डा बनेल आणि त्या ठिकाणी पुढे काही काळानंतर वरिष्ठ नागरिक, लहान मुले यांना फिरण्यासाठी  काही पर्याय उरणार नाही. उलट या गार्डनमध्ये तरुण- तरुणींसाठी आणि कॉलेजच्या युवक युवतींसाठी सावंतवाडी गार्डन ही  अश्लील चाळे करण्यासाठी राखीव जागा होईल.  हे नाकारता येणार नाही. अर्थात साहजिकच तरुण-तरुणी, कॉलेजच्या युवक युवती गार्डनमध्ये चुकीचे प्रकार करत असताना जर त्यांना सावंतवाडी शहरातील सुज्ञ नागरिकांनी विचारलं नाही किंवा तिथून हाकलून दिलं नाही तर या ठिकाणी हे प्रकार वाढत जातील आणि पुढे जाऊन हे प्रकार एवढे वाढतील की सामान्य नागरिकांना तिथे फिरणं ही शक्य होणार नाही.

त्याचप्रमाणे सावंतवाडी गार्डनच्या समोर आलिशान फोर व्हीलर गाड्या लावून त्यामध्ये युवक युवती अश्लील चाळे करतांना आढळून येत आहेत. या युवक युवतींना ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाणाऱ्या नागरिकांनी जाब विचारला असता तसेच तिथून जायला सांगितलं असता हे तरुण तरुणी लोकं उलट दादागिरी ची भाषा करून शिवीगाळ करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात शिवीगाळ करण्यामध्ये तरुण-तरुणी अर्थात मुली पुढे असतात.  ही अशीच परिस्थिती सुरू राहिल्यात सावंतवाडी शहरातील सुसंस्कृत सुशिक्षित नागरिकांसाठी जे सुंदर असं गार्डन बनवण्यात आलेले आहे त्या गार्डनमध्ये भविष्यात फक्त अश्लील चाळे करणाऱ्या कॉलेजच्या युवक युवती, तरुण-तरुणी आणि महिला पुरुष दिसतील. भविष्यात सावंतवाडी गार्डन अश्लील चाळ्यांचा एक अड्डा होणार की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.bवेळीच यावर योग्य उपाययोजना न केल्यास याच सावंतवाडी गार्डन हा अश्लील चाळे करणाऱ्या युवक युवतींचा अड्डा होईल हे नाकारता येणार नाही. त्यासाठी आता सर्वसामान्य नागरिकांनी वेळीच योग्य पाऊल उचलणं गरजेचे आहे.  सर्वसामान्य नागरिकांनी, समाज सुधारकांनी, जेष्ठ नागरिकांनी आणि जेष्ठ नागरिकांना युवक युवतींच्या अशा प्रकारांना विरोध करून त्यांना हाकलून देण्याचे काम केले पाहिजे.