Home स्टोरी सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधपासून नगरिकांची सुटका.

सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधपासून नगरिकांची सुटका.

128
साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी

सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील प्र.क्र ६ येथे मागिल अनेक महिने पाणी साठून दुर्गंधी तसेच त्या ठिकाणी कचरा जमत आहे. तेथील पाणी जायला मार्ग नसून आजची परिस्थिती पाहतात डेंग्यू तसेच इतर आजार होत आहेत. यावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार व खासकिलवाड्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते समीर पडते यांनी आक्रमक भूमिका घेत सावंतवाडी नगर परिषद यांचे लक्ष वेधले.

त्यावर तत्काळ सावंतवाडी नगरपरिषदेच्या कर्मचारी यांनी या ठिकाणी लक्ष देऊन दूषित जमलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा करत खासकीलवाड्यातील रहिवाशांना दिलासा दिला .

यावेळी उपरकर समर्थक आशिष सुभेदार युवा सामाजिक कार्यकर्ते समीर पडते, सुजय सुभेदार, मंगेश सुभेदार, प्रकाश बांदेकर, अनुप पडते, निलेश निर्गुण, मंदार सुभेदार, सुदेश जामदार, अमोल टिळवे, गॅब्रियल फूडताडो उपस्थित होते.

नगरपरिषदेचे लक्ष वेधल्यानंतर सदर कामाची सुरुवात झाली व उद्यापर्यंत हे काम पूर्णत्वास येईल असे आश्वासन नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिले