सावंतवाडी प्रतिनिधी: आज आम्हाला कोणी वाली आहे का? असा शहरवासीयांना आर्थ हाक देणारे व जीवाची तमा न बाळगून वर्षानुवर्ष शहरातील घाण न कंटाळता स्वच्छ करणारे कॉन्ट्रॅक्टबेसचे ६० सफाई कामगार म्हणजेच आपले कोरोना योद्धे यांना गेले दोन महिने पगार नाही, साडेतीन वर्षाचा पीएफ नाही आणि संबंधित ठेकेदार म्हणतो यांच्याशी माझा काही संबंध नाही. मुलांच्या कॉलेज- शाळेची फी भरणे मुश्किल झालीच आहे, परंतु घरामध्ये खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे झाले आहेत. फरार ठेकेदाराकडून न्याय मिळेल का? ह्या प्रतीक्षेत आपले स्वच्छता दूत आज सावंतवाडी नगर परिषदेच्या समोर बसून आपले दुःख व्यक्त करत आहेत. सदर स्वच्छता दुतांची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराकडून न्याय मिळेपर्यंत शहरवासीयां बरोबरच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचेहि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी ठाम भूमिका सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
