Home स्टोरी सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड समोरील उघडे असलेले गटार बंद करून आंबोलीकडे जाणारा...

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड समोरील उघडे असलेले गटार बंद करून आंबोलीकडे जाणारा अरुंद रस्ता रुंद करण्यात यावा ! सामाजिक बांधिलकीची मागणी.

172

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड समोरील आंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक गटार उघडे आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री सुमारे ९:१५ वाजण्याच्या सुमारास याच गटारांमध्ये एक महिला आपल्या मुलासहित पडली आणि ती गंभीर जखमी झाली. संबंधित विषय सामाजिक बांधिलकीच्या कार्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना समजल्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या महिलेला आणि मुलाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार केले. सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ह्या गटारामध्ये बऱ्याच वेळा तिथून ये जा करणारे व्यक्ती पडून अपघात उघडण्याचे प्रकार होत आहेत.

श्रीमती सीमा गोवेकर उपकार्यकारी अभियंता तथा जन माहिती अधिकारी

कित्येक दिवस होऊन सुद्धा या गटारांकडे बांधकाम विभागाचे लक्ष नसल्यामुळे आज सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीला या गटाराची माहिती दिली. या निवेदनाद्वारे हे उघडे असलेले गटार बंद करून आंबोलीकडे जाणारा अरुंद रस्ता रुंद करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतांना सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रवी जाधव, सतीश बागवे आणि संजय पेडणेकर उपस्थित होते.