Home स्टोरी सावंतवाडी येथील सोहम साळगांवकर “राष्ट्रीय बालश्री कला पुरस्कार” ने सन्मानित

सावंतवाडी येथील सोहम साळगांवकर “राष्ट्रीय बालश्री कला पुरस्कार” ने सन्मानित

209

सावंतवाडी: ‘दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान’ या मुंबई येथील नामांकित संस्थेचा या वर्षीचा ‘राष्ट्रीय बालश्री प्रसाद नागेश घाडी कला पुरस्कार‘ सावंतवाडी येथील कु. सोहम दिनेश साळगांवकर याला मिळाला आहे. कु. सोहम दिनेश साळगांवकर हे मूळ आजगाव येथील रहिवाशी आहेत.

दि. ०४ नोव्हेंबर रोजी भायखळा, मुंबई येथील ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहा’ त महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्मा. श्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त श्री रविराज इळये, दादा गांवकर सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते सोहम साळगांवकर यांना हा ‘राष्ट्रीय बालश्री प्रसाद नागेश घाडी कला पुरस्कार’ वितरीत करण्यात आला.सोहम हा राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे.

सोहमओस्टीओझेनेसिस इम्परफेक्टा‘ या हाडांच्या दुर्मिळ व कधीही बरा न होणाऱ्या आजाराने त्रस्त आहे. मात्र असं असूनही आपल्या दिव्यांगत्वावर मात करून सोहम अभ्यासासोबतच संगीत (शास्त्रीय गायन व हार्मोनियम वादन) साधना करत आहे. तो अतिशय सुंदर व गोड आवाजात गायन करतो. अ. भा. गांधर्व महाविद्यालयाच्या गायन, हार्मोनिअम वादनच्या तीन परिक्षा तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तसेच चित्रकला, बुद्धीबळ व कॅरम या विषयातही तो तरबेज आहे. तालुका जिल्हास्तरावरील अनेक स्पर्धांमधून त्याने पारितोषिके मिळवलेली आहेत. परिस्थितीवर मात करत सोहम साळगांवकर ने दाखवलेल्या या लढवय्या वृत्तीसाठी त्याला दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठाननेराष्ट्रीय बालश्री प्रसाद नागेश घाडी कला पुरस्कार‘ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सोहम साळगांवकरच्या या यशाबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे सोहमच्या संगीत शिक्षिका सौ. वीणा दळवी, राणी पार्वती देवी हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल सोहम चे सर्व शिक्षकवृंद व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.