सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील प्रसिद्ध चर्च चा सविस्तर प्रस्ताव द्या. या चर्चसाठी काही मदत करता येईल का यासाठी आपण प्रयत्न करेन. असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले. सावंतवाडी येथील प्रसिद्ध जुने चर्च त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. हे चर्च जुने असून एक ऐतिहासिक ठेव आहे. सिंधुदुर्गाच्या पर्यटन दृष्ट्या हे चर्च फार महत्त्वाचे असून या चर्चा उभारणीसाठी शासनामार्फत मदत मिळावी यासाठी सावंतवाडीतील ख्रिस्ती बांधवांचे शिष्ट मंडळ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं यावेळी श्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. निश्चितपणे आपण याकडे लक्ष देऊ मात्र आपण सविस्तर प्रस्ताव द्या. शासनाच्या माध्यमातून काही मदत करता येईल का? तसेच आपल्या माध्यमातून आपण निश्चितपणे या चर्चा उभारणीसाठी सहकार्य करेन असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी फादर मिनिट डिसोजा, माजी नगराध्यक्ष अनारोजन लोबो, ऑगस्तिन फर्नांडिस, गेगरी डान्सट, अबेलीन डिसोजा, फ विमा डिसोजा एडवोकेट अनिल निरवडे कर आधी उपस्थित होते.