सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील आरंभ सखी ग्रुपच्यावतीने बुधवार ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत आरपीडी कॉलेजमध्ये महिला व युवतींसाठी गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले आहे.
या गरबा नाईटच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोसले तसेच भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विशाल परब व त्यांच्या पत्नी सौ वेदिका परब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या गरबा नाईटमध्ये लकी ड्रॉ कुपनमधून विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात येतील.
या गरबा नाईटमध्ये सावंतवाडी परिसरातील युवती व महिलांनीसावंतवाडी परिसरातील महिलांनी उपस्थित राहून सहभागी होऊन नवरात्रीच्या आनंदाच्या या पर्वात सहभागी व्हावे असे आवाहन आरंभ सखी ग्रुपच्या पल्लवी रेगे, डॉ संजना देसकर, देवता हावळ, दर्शना रासम, प्रज्ञा नाईक, संगीता शेलाटकर, नेहा मडगावकर, स्मिता नार्वेकर, सुरेखा रायका, आदिती नाईक, डॉ अश्विनी खानोलकर, डॉ मानसी वझे यांनी केले आहे