सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी भटवाडी येथील विठ्ठल मंदिर येते आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. बुधवार १७ व रविवार २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५:३० वाजता काकड आरती. सकाळी ७:३० विठ्ठल रखुमाई महापूजा आरती. सायंकाळी सात तीस वाजता भागवत पुराण वाचन रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवार २१ जुलैला गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल मंदिर येथून भेटीसाठी पालखीचे आगमन सकाळी ११:३० वाजता होणार आहे. सायंकाळी सहा वाजता गुरुपौर्णिमा निमित्त ह. भ. प. श्री. संदीप माडके बुवा पुणे यांचे कीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.