Home स्टोरी सावंतवाडी भटवाडी येथील जुने आणि संस्कृत भगवत गीता ग्रंथ संग्रहालय असलेले ग्रंथालय सर्वांसाठी...

सावंतवाडी भटवाडी येथील जुने आणि संस्कृत भगवत गीता ग्रंथ संग्रहालय असलेले ग्रंथालय सर्वांसाठी आता खुले करण्यात आले!

157

सिंधुदुर्ग : आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात वाचन संस्कृती आणि वाचक कमी होत आहेत. असं सगळेजण म्हणू लागले आहेत. काळ कितीही बदलला तरी वाचक हा कधीही बदलत नाही. तो वाचतच असतो. आज बदलते तंत्रज्ञानानुसार आपण बदलायलाही हवे अन त्याचा स्वीकारही करायला हवा. मात्र  जुने सोडून द्यायला नको. जुने आणि बदलते तंत्रज्ञान याची सांगड घालून आजच्या तरुणाईला वाचक साहित्य ग्रंथालय चळवळीकडे आकर्षित करण्याची जबाबदारी आपलीच आहे. तरच पुढच्या पिढीसमोर  ग्रंथालय चळवळ पोहोचेल आणि हे कार्य सावंतवाडी भटवाडी येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा यांनी ११९ वर्षांपूर्वीचे ग्रंथालय नव्या जोशात घेऊन पुन्हा पुनर्जीवित केले आहे. हे करमग्रंथालय आगळे वेगळे असे आहे. या ग्रंथालयात संस्कृत भाषा शिकवणी वर्ग केंद्र सुरू करण्यास कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या माध्यमातून सर्व सहकार्य केले जाईल असे मत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्षॲड संतोष सावंत यांनी व्यक्त केले. हे जुने आणि संस्कृत भगवत गीता ग्रंथ संग्रहालय असलेले ग्रंथालय सर्वांसाठी आता खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी संस्कृत पाठशाळा आधी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. असे वेदशास्त्र संस्कृत पाठशाळ संस्थेचे अध्यक्ष बाळा पुराणिक यांनी सांगितले. सावंतवाडी भटवाडी येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा सन १९०४ झाली स्थापन झाली आहे. या पाठशाळेत तेव्हापासून ग्रंथालय आहे. मात्र आता हे ग्रंथालय आताच्या संस्थेने नव्याने पुनर्जीवीत केले. त्या नव्या पुनर्जीवित ग्रंथालयाचे उद्घाटन दीप प्रज्वलन ॲड सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरस्वती देवी भगवत गीता ग्रंथ यांचे विधिवत पूजन वेदमूर्ती श्री भूषण केळकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अध्यापक संघाचे राज्य कार्याध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, डॉ शुभदा करमळकर, जिल्हा ब्राह्मण संघाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळूणकर, वेदमूर्ती भूषण केळकर गुरुजी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळ पुराणिक, सचिव शिवानंद भिडे, खजिनदार गणेश दीक्षित, चंद्रकांत घाटे, घनश्याम गणपुले, विश्वेश्वर कोळंबेकर, अनुजा भागवत, रवींद्र गगन ग्रास, सुरेश पुराणिक, जनार्धन भागवत, भालचंद्र कशाळीकर, ब्राह्मण संस्थेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रसाद मराठे, चिंतामणी मुंडले, श्री गुरुदास देवस्थळी, सौ वैभवी पुराणिक, सौ देवस्थळी आधी उपस्थित होते. यावेळी ॲड सावंत पुढे म्हणाले गावा गावात शहरात ग्रंथालय आहेत. पण या ग्रंथालयात संस्कृत आणि भगवत गीता आधी आगळीवेगळी पुस्तके जी आजच्या काळात वाचायला हवीत अशी आहेत आणि हे ग्रंथालय आता सर्वांसाठी खुले आहे. या ग्रंथालयाचा लाभ सर्वांनी घ्यावा. हे ग्रंथालय महाराष्ट्रात एक संस्कृत सर्व सुविधायुक्त ग्रंथालय म्हणून ओळख होईल. या ग्रंथालयात संस्कृत वर्ग केंद्र सुरू करावेत आणि त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. मोबाईल, व्हाट्सअप, गुगल आधी नवतंत्र आले याचाही उपयोग करून बदलत्या परिस्थितीनुसार ग्रंथालय चळवळ पुढे न्यायला हवी असे ते म्हणाले. यावेळी भरत गावडे यांनी वाचेल तो वाचेल संत रामदास स्वामी यांनी चहा ओळी आपल्यासमोर ठेवल्या आहेत. त्यानुसार आपण वाचत राहायला हवे आणि जे वाचतो त्याचे टिपणी करून ठेवायला हवी. तरच आपण काय वाचलो? हे आकलन होईल. या ग्रंथालयाला आपण साने गुरुजींची पुस्तके भेट म्हणून देणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री पुराणिक म्हणाले हे ग्रंथालय जुने आहे. या ग्रंथालयाला संस्थेने पुनर्जीवित केले आहे. ज्या बदलत्या काळानुसार हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले करण्यात आले असून या ग्रंथालयात संस्कृत पाठशाळा वर्ग आणि शासनाच्या माध्यमातून एक संस्कृत पठाण केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. तसेच वकृत्व लेखन आधी विविध स्पर्धा येत्या काळात घेण्यात येतील. तसेच ग्रंथालयासाठी ही वेगळी पाच जणांची कमिटी नियुक्त करून हे ग्रंथालय वेगळ्या पद्धतीत निर्माण केले जाईल. व ग्रंथालय सभासद ही वाढवण्यात येतील. या ग्रंथालयामध्ये सर्वांनी यावे आणि पुस्तकही वाचावीत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉक्टर सौ करमळकर म्हणाल्या आमच्या कुटुंबीयांच्या नावे हे ग्रंथालय सुरू होत आहे. निश्चितपणे एक ग्रंथालय एक वाचन चळवळ निर्माण करत आहे. या ग्रंथाला आपण पाच हजार रुपयाची पुस्तके भेट म्हणून देणार आहे. यावेळी राजाराम चिपळूणकर यांनी हे जुने ग्रंथालय आता पुनर्जीवित झाले आहे. निश्चितपणे याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि हे ग्रंथालय एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवावे. यावेळी प्रास्ताविक सचिव शिवानंद भिडे यांनी करताना संस्थेची तुरा या नव्या कमिटीच्या हाती आल्यानंतर या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे जुने ग्रंथालय नव्या धरतीवर उभे करण्याचा संकल्प केला आहे आणि हे ग्रंथालय सर्वांसाठी वाचानीय ग्रंथालय ठरावे, असे नियोजन केले आहे. सूत्रसंचालन व आभार विनायक गाडगीळ यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

फोटो सावंतवाडी वेद शास्त्र संस्कृत पाठशाळा येथील सौ शशिकला माधव, करमळकर ग्रंथालय चे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना कोम साप चे तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत, बाजूला भरत गावडे, बाळा पुराणिक, राजाराम चिपळूणकर, डॉक्टर शुभदा करमळकर, शिवानंद भिडे, विनायक गाडगीळ, चंद्रकांत घाटे, भूषण केळकर गुरुजी, गणेश दीक्षित, सुरेश पुराणिक, भालचंद्र कशाळीकर, रवींद्र गगनग्रास आधी.

छाया श्री गुरुदास देवस्थळी