पद्मनाभा नारायणा कधी भेटेन वनवासी. नाट्यपद, रूप पाहता लोचनी,. अशा अनेक भक्तिगीत नाट्यगीत गवळणी सादर करत. स्वतः जवळपास दोन हजारहून अधिक गीत नाट्यगीतांना चाल देणारे सुप्रसिद्ध कलाकार अभिनव गंधर्व पंडित श्री रघुनाथ जी खंडाळकर व त्यांचे शिष्य सुपुत्र गायक सुरंजन खंडाळकर व गायक शुभम खंडाळकर या प्रसिद्ध पितापुत्र गायकांची मैफिल सावंतवाडी भटवाडीत रंगली सावंतवाडीकर संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत या तिन्ही प्रसिद्ध गायकाने आपल्या सूर ताल आवाजात गुरुवारची संध्याकाळ भक्तिमय रसात उधळून नेली निमित्त होतं. श्री प पूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या स्थापन झालेल्या भटवाडी सावंतवाडीतील श्री दत्त मंदिर येथे गुरु प्रतिपदे उत्सव निमित्ताने या प्रसिद्ध कलाकार गायकांची संगीत मैफिल आयोजित करण्यात आली होती.
पुणे येथील स्कूल च्या संचालिका सौ. सुजाता परांजपे सावंतवाडी भटवाडी, दत्त मंदिर आरती परिवार,भटवाडी ग्रामस्थ यांच्या यांच्या सहकार्याने. संगीत रजनी मैफिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुप्रसिद्ध कलाकार अभिनव गंधर्व पंडित श्री रघुनाथजी खंडाळकर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार सामाजिक कार्यकर्ते उदय अळवणी यांच्या हस्ते करण्यात आला. तर त्यांचे सुपुत्र गायक सुरंजन खंडाळकर यांचा सत्कार अभय नेवगी तर गायक शुभम खंडाळकर, प्रशांत अळवणी, तबलावादक रोहित श्रीवंत यांचा सत्कार सुनील सावंत, पखवाज वादक श्री पार्थ भूमकर यांचा सत्कार किशोर सावंत, या संगीत मैफिलीला साथ देणारे श्रावणी थिटे यांचा सत्कार शशिकला अळवणी, सौ सुर्वी खंडाळकर यांचा सत्कार ऐश्वर्या तेजम तर बाळू कशाळीकर, आबा कशाळीकर, सानू सुभेदार आदींचा सत्कार विना दळवी, रीमा परांजपे वैष्णवी कुट यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सूत्रसंचालक संजय कात्रे यांचाही सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सर्व कलाकारान्चा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी दत्त मंदिर भटवाडी येथे गुरु प्रतिपदा निमित्ताने प्रसिद्ध कलाकार अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर यांनी आपल्या सुर ताल मधून जवळपास दोनशे अभंग भक्तीगीत नाट्यगीतांना विविध अंगाने चाली दिले आहेत. त्यातील जवळपास काही अभंग गवळणी नाट्यगीत सादर करत रसिकांना भजनामध्ये दंगून ठेवले. रूप पाहता लोचनी हा अभंग सादर करताना अभंगाचे अनेक पैलू मांडताना समोर विठ्ठल उभा केला. देव एका पायाने लंगडा ही गवळण सादर करताना उपस्थित संगीत प्रेमी दंग होऊन गेले या तिन्ही गायकानी आपल्या सुरेल आवाजाने सावंतवाडी भटवाडी चा परिसर संगीत मैफिलीमध्ये दंगून गेला .अभंग गौळणी व नाट्यगीतानी संगीत रसिकाना. या तीन प्रसिद्ध गायकांची संगीत श्रवण पर्वणी प्राप्त झाली. या संगीत कार्यक्रमात नितीन धामापूरकर यांनीही साथ दिली. या संगीत रजनी कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन संजय कात्रे यानी तर उपस्थितांचे आभार शशिकला अळवणी यानी मानले.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर, सौ भोसले माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सुनील सावंत, किशोर सावंत, मयूर पिंगुळकर, श्याम पंडित आधी उपस्थित होते. गुरु प्रतिपदा उत्सव शानदार पद्धतीने विविध धार्मिक दत्त महापूजा आधी कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सावंतवाडी भटवाडीतील ही संगीत मैफिल यादगार ठरली.