Home स्टोरी सावंतवाडी बंदीवानांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन..! सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे आयोजन.

सावंतवाडी बंदीवानांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन..! सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे आयोजन.

87

ओटवणे प्रतिनिधी: 

सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्यावतीने सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदीवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.

यावेळी सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश जे एम मेस्त्री, जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सतिश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे, सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्या आर्या अडुळकर, कारागृह हवालदार अर्जुन घोडके, संदीप शेटे, सुभेदार महादेव गवस आदी उपस्थित होते.

यावेळी दिवाणी न्यायाधीश जे एम मेस्त्री यांनी बंदीवानांना हक्क व अधिकार याच्या पुर्वी कर्तव्य हे श्रेष्ठ असते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना कारागृहातील न्यायालयीन बंदीवानांना कायदेविषयक सहाय्य व सल्ला याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनी, सुत्रसंचालन सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्या आर्या अडुळकर यांनी तर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सतिश कांबळे यांनी सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहातील न्यायालयीन बंदीवानांना कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित केल्याबद्दल सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे आभार मानले.