Home क्राईम सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गडांगळे लाच लुचपत विभागाच्या ताब्यात..

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गडांगळे लाच लुचपत विभागाच्या ताब्यात..

239

सावंतवाडी: सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गडांगळे यांना तब्बल  एक लाखाची लाच स्वीकारतांना रायगड लाच लुचपत विभागाचे रायगड उपधिक्षक यांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक व उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्य दोन संशयित लाच लुचपत विभागाच्या पटलावर असल्याची माहिती आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, आठ तारीखला तक्रार घेतली. दोघांविरुद्ध ४२० चा गुन्हा आहे. तक्रारदार यांना मदत करण्यासाठी एक लाखाची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस अधिक्षक सुनील लोखंडे, अनिल घेरडीकर, रणजित गलांडे, जाधव, महेश पाटील, विनोद जाधव, कौस्तुभ मगर, विवेक खंडआगळे, सचिन आटपआकर, सागर खंडागळे आदींनी ताब्यात घेतले आहे.

पुढील तपास रायगड लाच लुचपत विभागाचे रायगड उपधिक्षक आणि त्यांचे सहकारी करत आहेत.