सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी पुणे शिवशाही बस सायंकाळी सात वाजताची चालक नसल्यामुळे तब्बल एक तास प्रवाशांना सावंतवाडी बस स्थानकात तात्काळत राहण्याची वेळ आली. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी शहरप्रमुख सतीश नार्वेकर यांनी सावंतवाडी एसटी आगाराच्या एकंदरीत कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळी सात वाजता सुटणारी शिवशाही पुणे बस पावणे आठ वाजेपर्यंत स्थानकात आलीच नाही. याबाबत प्रवाशांनी विचारणा केली असता चालक आजारी असल्यामुळे ही गाडी आता वेळेत सुटत नाही. असे सांगण्यात आले नेहमीच असा प्रकार या बस बाबत होत असतो चालक अचानक आजारी कसा काय पडला? असा सवाल श्री नार्वेकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी एसटी आगारातील अशा या कारभारामुळे प्रवासी यांनी नाराजी व्यक्त केली