Home स्टोरी सावंतवाडी न. पा. प्रशासकीय कार्यभार प्रभारी कर्मचा-यांच्या खांद्यावर.

सावंतवाडी न. पा. प्रशासकीय कार्यभार प्रभारी कर्मचा-यांच्या खांद्यावर.

132

सावंतवाडी:- नगरपरिषदेत गेली सहा महिने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने, विभाग प्रमुख निवृत्त झाल्याने यांचा कार्यभारप्रभारी कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केल्याने कामकाजात अनियमितता येत असून काम बंद आंदोलन, पाण्यात जंतू, रस्त्यावरील खड्डे, गटार सफाई न होणे, दिवसाढवळ्या पतदिव्ये चालू असणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.

 

सावंतवाडी नगरपरिषद्ध ही संस्थानकालीन तगरपरिषदं असून राज्यात आर्थिक दृष्ट्या अव्वल स्थानावर आहे. येथील लोकनियुक्त प्रतिनिधींचा लोकाभिमुख कारभारामुळे न. पा. राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले. हे विसरून चालणार नाही. परंतु लोकनियुक्त प्रतिनिधीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शासनाने प्रशासक नेसून त्याच्या न.पा. कार्यभार सोपवला. या प्रशासनाकडे अगोदरच मोठा प्रशासकीय कार्यभार असल्याने न.पा. प्रशासनावर लोकभुमुक पकड ठेवता आली नाही.  पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, अभियंते निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी सुमार शैक्षणिक प्राप्तता असलेल्यांकडे कार्यभार सुपूर्त आहे.

 

विद्युत विभाग- येथे विभागाकडून शहरातील पथदिवे न.पा. मालमत्तेचे विद्युतीकरण करण्याचे कामे केले जाते. या विभागाचा प्रमुख हा विद्युत अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असणे गरजेचे असते परंतु सध्या हा कार्यभार तारतंत्रि कामगारावर सोपवण्यात आला आहे.  आणि  पथदिवे अन्य दुरुस्ती ठेकेदारी, कर्मचारी नेमून केली जाते.

 

आरोग्य विभाग – या विभागात आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, चार लिपिक, मेस्त्री, दोन शिपाई असा भरभक्कम कर्मचारी वर्ग आहे. परंतु कचरा गाड्या व अन्य गाड्या वरील कायमस्वरूपी वाहन चालक निवृत्ती झाले आहेत. सध्या वाहन चालकांचे काम सफाई कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जात आहे. याचे उदा. मुख्याधिकाऱ्यांची गोडी चालविणारा होय.

 

पाणीपुरवठा विभाग – पाणीपुरवठा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी शाखातील अभियंता निवृत्त झाले आहेत. ह्यांचा कार्यभार वरिष्ठ लिपिक निरीक्षक पदावरील कर्मचायांबर सोपवला आहे. गाळणी चालक पंप चालक, जोडारी ह्या पदावरील कर्मचारी निवृत्त झाले असून एकच गाळणी चालकाकडे हा कार्यभार आहे. इतर कामे सध्या कंत्राटीकर्माच्या-यांकडून करून घेतली जातात. ५० कोटीच्या पाणी योजनेचे काम सुरु असूनही यावर देखरेख व कामकाजाची गुणवत्ता पाहण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील अभियंता नाही. लिपिक पदावरील कर्मचारी निवृत्त झाले असून त्याचा कार्यभार ठेकेदारी कर्मचाऱ्यावर सोपवला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ५० कोटींची पाणी योजना येवढे मोठे शहर असूनही यावर स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील अनुभवी अभियंता नाही.

 

बांधकाम विभाग – बांधकाम विभागातील तीन अभियंते निवृत्त झाले असले तरी रिक्त झालेल्या जागी पुन्हा अभियंता नियुक्त करण्याची तत्परता दाखविण्यात आली असली तरी रस्त्यावरील खड्डे जेथे आहेत हे खड्डे भरण्यासाठी सामाजिक संस्थांना पुढे येऊन पदरमोड करून रस्त्यावरील खड़े भरावे लागतात.

 

सामान्य प्रशासन– विभाग लेखा विभाग आस्थापना विभागात पूर्ण क्षमतेने कर्मचारी वर्ग असला तरी कामगाराच्या भविष्य निर्वाह निधीतील अनियमिततेचा प्रश्न चिंताजनक आहे. तर आश्वासित प्रगती योजनेसाठी वेतन वाढीसाठी कर्माच्या-यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

 

कर विभाग:: कर विभाग हा कार्य तत्पर असून त्यांनी मालमत्ता कर गोळा करण्यास अनेकदा उद्दिष्ट साध्य करण्यास विशेष योगदान देत असल्याने न.पा. चा आर्थिक डोलारा सांभाळला जात आहे. गेले सहा महिने कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद रिक्त असून अतिरिक्त कार्यभाराचा संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. कायमस्वरूपी मुख्य अधिकारी आणण्यास लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत अशी चर्चा जनमानसात आहे.

कंत्राटी कर्मचारी प्रभावी प्रभारी कार्यभार म्हणजे उंटावरून शेळ्या आखणे होय..!

सध्या सहायुक्त कडे मालवण सावंतवाडी या नगरपरिषद अतिरिक्त कार्यभार असून जिल्हा नगर विकास सहायुक्त प्रमुख कारभार आहे कामकाजाचे पाच दिवस प्रत्यक्ष नगरपरिषद कामकाजाचा दीड दिवस मिळतो सेवा परीक्षा पास होऊन सरळ सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या अल्प असली तरी शासनाच्या आऊटसोसिंग धोरणानुसार अनेक विभागात शिपाई लिपिक मंजूर पदावरील कर्मचाऱ्यांची पाहिल पेक्षा भाऊ गर्दी जास्त दिसून येते.  शहरात तरुण-तरुण बेरोजगार असून निवृत्त झालेल्या व सत्तरी पार केलेल्या शिपाई पदावर ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केले गेले जाते कष्टाचा कामगार  पदावर 65 वर्ष केलेल्या कर्मचारी कार्यरत आहेत.  तरी काही विभागात राजकारण घराणेशाही चालते.