Home स्टोरी सावंतवाडी न्यू खास किल वाडा येथील काड सिद्धेश्वर महाराज मठात शोभाताई यांचे...

सावंतवाडी न्यू खास किल वाडा येथील काड सिद्धेश्वर महाराज मठात शोभाताई यांचे प्रवचन उत्साहात संपन्न.

78

सावंतवाडी प्रतिनिधी: विश्वास हा शब्द आज फार महत्त्वाचा झाला आहे आज माणसावरचा विश्वास राहिलेला नाही जर तुमच्यामध्ये विश्वास असेल तर तुम्ही परमार्थ मिळवू शकाल. आनंद नेमका कशात आहे. हे ओळखायला हवे. आत्मानंद हेच खरे सुख आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत महात्मा यांनी आत्मानंद मिळवला होता म्हणूनच ते श्रेष्ठ आहेत. आज माणसामधील प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा आत्मानंद मिळवायला हवा तरच गुरु माऊली ची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्ही जीवनात सुखी समाधानी रहाल. तुम्ही जे पाप कर्म करता ते तुम्हाला पुढील जीवनात भोगायलाच हवे. म्हणून आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीने आपला आत्मानंद आणि विश्वास हा जागृत ठेवायला हवा अशा शब्दात माणसाने कसे जगायला हवे? असा संदेश परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्य गुरुमाऊली शोभाताई यांनी आपल्या प्रवचनात दिला.

सावंतवाडी न्यू खास किल वाडा येथील काड सिद्धेश्वर महाराज मठात शोभाताई यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी परमपूज्य शोभाताई यांचे स्वागत या मठाचे भक्तगण श्याम सुंदर गावडे, राजन गावडे, बंटी गावडे, लखन गावडे, नंदू गावडे, महेश मराठे यांनी केले. यावेळी संतोष गवस, श्री. साठेलकर, श्री कोरगावकर, स्मिता शेटय, अतुल वाढोकर, श्री लोंढे आधी उपस्थित होते.

यावेळी परमपूज्य गुरुमाऊली शोभाताई म्हणाल्या. तुम्ही जे चांगले वाईट करता त्याचा परिपाक हा तुम्हाला भोगावच लागतो. तुम्ही जर चांगले कर्म केला तर तुम्हाला पुढील जन्मात मनुष्य म्हणून जगता येईल. पण तुम्ही जर पाप कर्म केलात तर तुम्हाला पुढच्या काळात दोन पाय ऐवजी चार पाय मध्ये जन्माला यावे लागेल. म्हणजे तुम्ही जनावरांमध्ये जन्माला याल आणि यावेळी तुमची अवस्था काय असेल हे ओळखा. म्हणून जगण्यासाठी तुमच्यामध्ये श्रद्धा आणि विश्वास आणि आत्मसन्मान असायला हवा. संत माऊली यांनी आनंद कशात आहे? हे आपल्या अभंगवाणीतून सांगितले आहे. आनंद हा भौतिक गोष्टीवर आधारित नसून तो तुमच्या आत्मसन्मान आत्मा नंदा मध्ये दडलेला आहे. हा आत्मानंद हाच खरा कायम टिकणारा आनंद आहे आणि यासाठी अध्यात्माची कास गुरुमाऊलीची शिकवण स्वामींचे आचरण करायला हवे. आजच्या काळात माणसे मोबाईल मध्ये गुंतली आहेत त्यामुळे विश्वास श्रद्धा हरपली आहे. तुम्ही दासबोध चे आचरण करा म्हणजेच जगायला कसे हवे आणि कसा आनंद मिळवायला हवा हे शिकता येईल. आपण नेमके मनुष्य म्हणून जन्माला आलो मग आपली नेमकी कर्तव्य काय आहेत ही कर्तव्य ओळखून तुम्ही तुमचा आत्मानंद मिळवायला हवा असा संदेश त्यांनी दिला. यावेळी स्मिता शेटय यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शिष्यांना आपण कसे जगायला हवे?आणि कसे राहायला हवे? आणि विश्वास आणि भुलभुलय्यांना बळी न पडता वास्तव्यात जगायला हवे, प्रामाणिक माणसे कशी आहेत? हे ओळखायला हवे असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांचे अध्यात्मिक वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिष्य भक्तगण उपस्थित होते. यावेळी भजन कीर्तनाने जागर करण्यात आला.