Home स्टोरी सावंतवाडी नगरपालिकेतील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात गणेश चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सावंतवाडी नगरपालिकेतील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात गणेश चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

188

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी नगरपालिकेतील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेतर्फे व इंदिरा गांधी व्यापारी संकुल संत गाडगेबाबा भाजी मंडई राष्ट्रीय एकात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. खास महिला मंडळांसाठी खेळ पैठणीचा व फुगडी स्पर्धा तसेच भजन स्पर्धा ऑर्केस्ट्रा आधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सावंतवाडी नगरपालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात व्यापारी आदींची बैठक घेतली या बैठकीत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी गणपती उत्सवाच्या सहाव्या दिवसापासून विसर्जन पर्यंत म्हणजे अनंत चतुर्थी पर्यंत विविध कार्यक्रम करण्याबाबत त्यांनी सूचित केले. त्यानुसार कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले. सावंतवाडी शहरातील प्रत्येक वार्डनिहाय महिलांची खेळ पैठणी व फुगडी स्पर्धा प्रत्येकी दोन दिवस दुपारी तीन ते पाच या वेळेत घेण्यात येणार आहे.

महिलांच्या खेळ पैठणी स्पर्धेमध्ये विजेत्या पैठणीला आकर्षक बक्षीस व पैठण दिली जाणार आहे. तसेच सहभाग घेतलेल्या महिलांना भेटवस्तू दिली जाणार आहे. तसेच महिलांची फुगडी स्पर्धा होणार आहे. सकाळी दहा वाजता आरती त्यानंतर दुपारी तीन ते पाच महिलांचे कार्यक्रम सायंकाळी पाच ते आठ भजन स्पर्धा रात्री आठ वाजता आरती आणि नऊ ते रात्रीपर्यंत ऑर्केस्ट्रा आधी कार्यक्रम होणार आहेत. तरी या स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रभागातील व्यक्तीने या सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.श्री केसरकर यांनी यंदा आपण आगळ्यावेगळ्या पद्धतीने विविध कार्यक्रमाचा एक ख मंगलमय वातावरणात गणपती उत्सव साजरा करूया असे ते म्हणाले.