Home Uncategorized सावंतवाडी नगरपरिषद फायर फायटर श्रेयवाद सुरू असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी...

सावंतवाडी नगरपरिषद फायर फायटर श्रेयवाद सुरू असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आग विझवून केले फायर फायटरचे उद्घाटन.

76

दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मनोहर मालवणकर यांचा दाणोलीतून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना फोन आला. श्री साटम महाराज यांची झरी (पाण्याचा वाहता झरा) येथील मोठ्या झाडाला आग लागली त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

साळगावकर यांनी तात्काळ सॅनिटरी अधिकारी नाटेकर यांना याची कल्पना दिली. श्री नाटेकर व श्री नंदू गावकर तात्काळ नवीन फायर फायटर घेऊन घटनास्थळी दाखल झाले. व तेथील आग विझवून पुढे होणारा मोठा अनर्थ टाळला. या सेवातत्पर कार्याचे तेथील ग्रामस्थांनी माजी नगराध्यक्ष बबन सागावकर व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक व आभार मानले.