सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्याने शाळा तिथे दाखले या उपक्रमात जवळपास दहा हजार एकशे सत्तर दाखल्यांचे वितरण केले आहे. आता कॉलेज तेथे दाखला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी येत्या दिवाळी सुट्टीत ग्रंथालयातील एक तरी पुस्तक वाचावे आणि या पुस्तकाच्या आधारावर निबंध लेखन करावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खो खो. ॲथलेटिक्स खेळावर प्राधान्य द्यावे. असे मत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी व्यक्त केले.. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने सेवा पंधरावडा उपक्रमाद्वारे शाळा तेथे दाखले असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सावंतवाडी तालुक्यात जवळपास साडेदहा हजार दाखल्यांचे वितरण महा-ई-सेवा केंद्राद्वारे करण्यात आले आहे. आज शनिवारी कलंबिस्त हायस्कूलमध्ये जवळपास ५०० विद्यार्थ्यांना या दाखल्यांचे वितरण कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त हायस्कूलचे संचालक सुनील राऊळ, कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड संतोष सावंत, मंडल अधिकारी सौ भारती गोरे, महा ई सेवा केंद्राचे संचालक प्रमोद नाईक, मुख्याध्यापक अभिषेक जाधव, रवी कमल सावंत, शरद सावंत, किशोर वालावलकर आधी उपस्थित होते.

यावेळी श्री पाटील यांनी शाळा तेथे दाखले उपक्रमात साडेदहा हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. आता यापुढे कॉलेज तेथे दाखला असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वैद्यकीय दाखला अवघ्या एका तासात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही महसूल विभाग अंतर्गत करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुका शाळा तेथे दाखले उपक्रमात अग्रेसर ठरला आहे. विद्यार्थी तसेच आम्हाला दाखल्यासाठी हेलपाटा माराव्या लागत होत्या आणि ही पाळी विद्यार्थ्यांवरून येऊ नये. या दृष्टीने आम्ही जेव्हा या महसूलच्या विभागात कार्यरत झालो तेव्हापासून विद्यार्थ्यांना आम्ही दाखले वेळेत देण्याची व्यवस्था केली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती घोडामिसे यांनी कार्यभार हाती घेताच विद्यार्थ्यांना थेट शाळेत दाखले देण्याचा उपक्रम राबवण्याचे हाती घेतले आणि त्यानुसार आता शाळेत दाखले दिले जात आहेत. पालक शिक्षक विद्यार्थी यांनी चांगले सहकार्य केले आहे. असे ते म्हणाले. मी नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी मला स्पोर्ट मध्ये खास आवड होती. खो-खो हा माझा आवडीचा विषय. विद्यार्थ्याने शालेय अभ्यासक्रमाबरोबर शाळेत नेहमी स्पोर्टला महत्त्व द्यायला हवे. शाळेत जे शिकवलं जातं तेच योग्य पद्धतीने शिकले पाहिजे त्यापेक्षा अधिक काही करू नका. ते तुमच्या जीवनाला कलाटणी देईल. या दिवाळी सुट्टीत तुम्ही निश्चितपणे एक पुस्तक वाचा असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक. ॲड संतोष सावंत यांनी वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक तरी पुस्तक वाचा. हा उपक्रम आता शाळांमध्ये आयोजित केला जाईल. याची सुरुवात इथून होत आहे. ग्रंथालय व साहित्य चळवळीच्या मार्फत निश्चितपणे असे उपक्रम घेतले जातील. असे ते म्हणाले. प्रमोद नाईक यांनी जवळपास २००० दाखले तयार केले. आणि वेळेत उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक किशोर वालावलकर तर आभार मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.







