सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यात, माडखोल, कारिवडे, सांगेली, कलंबिस्त पंचक्रोशीत आज रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हादरे बसले. मोठा आवाज होऊन जमीन हादरली. त्यामुळे तो भूकंपाचा सौम्य धक्का असावा, अशी माहिती या परिसरातील लोकांनी दिली. परंतु शाशकीय यंत्रणेकडून अधिकृत माहिती नाही.