Home स्टोरी सावंतवाडी तालुक्यात अनेक जनावरांचा लंपीमुळे मृत्यु!

सावंतवाडी तालुक्यात अनेक जनावरांचा लंपीमुळे मृत्यु!

209

सावंतवाडी: तालुक्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी लंपी रोगांचे प्रादुर्भाव वाढत असताना दिसत आहे. त्यामुळे अनेक जनावरे लंपीमुळे मृत्युमुखी पडत आहेत. अशीच घटना मळेवाड माळकरटेंब येथे घडली असून घनश्याम मुळीक यांची एक गाय व एक पाडा लंपीमुळे मृत्यु पावल्याने मुळीक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लंपी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वैद्यकीय सेवा देण्यासाठी होत असलेली टाळाटाळ असे चित्र दिसून येत असून यामुळे शेतकरी वर्गातूनही नाराजी व्यक्त केली जात आहे

नेमळेत गोकुळ दूध संकलन केंद्र झाल्यापासून नेमळेतील पन्नास टक्केहुन अधिक शेतकऱ्यांनी दुभत्या गाई -म्हशी खरेदी केल्या .मात्र आठ ते दहा दिवसात लंपी या आजाराची लागण गुरांना झपाट्याने होत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .या आजारामध्ये गुरांना ताप येत असून गुरांच्या अंगावर फोड येतात नाकातून शेंबूड येत असून एका पायाला सूज येते. वेळीच उपचार न केल्यास गुरे दगवण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता अशी लक्षणे दिसताच वेळीच पासुवैद्यकीय अधीकाऱ्यांकडून उपचार करून घयावेत तसेच लंम्पिची लागण होऊ नये यासाठी शासनाकडून मोफत लसीकरण करण्यात येत असून शेतकऱ्यानी सहकार्य करावे असे आवाहन पशु वैद्यकीय अधिकारी धनंजय कुट्टार यांनी सर्व पशु पालक शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकऱ्यांच्या जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा द्यावी अशा सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण व जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पशू विभागाला तात्काळ द्याव्यात अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.