Home स्टोरी सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये ‘चला समजावून घेऊया बापू साहेब महाराज’ उपक्रमाचे आयोजन.

सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये ‘चला समजावून घेऊया बापू साहेब महाराज’ उपक्रमाचे आयोजन.

97

सावंतवाडी प्रतिनिधी: समर्थ साटम महाराज वाचनालय, दाणोली या संस्थेच्या वतीने सावंतवाडी संस्थानचे अधिपती भूतपूर्व राजे पुण्यश्लोक बापू साहेब महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाळा शाळांत ‘चला समजावून घेऊया बापू साहेब महाराज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जून ते ४ जुलै या कालावधित या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

 

आपल्या संस्थानचे भूतपूर्व राजे त्यांची कर्तवभारी- व भौरबीचा शौर्य, पराक्रम, तसेच महारांजाचे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, लप्करी सेवा, पौढ साक्षरता, कृषिविषयक धोरण, व्यायप्रियता, व रामराज्य यांची माहिती आजच्या तरुण पिढीला कळावी, या उद्देशाने या व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. चौकूळ, आंबोली, कोलगांव, कुणकेरी व दाणोली परिसरातील माध्यामिक व उच्चमाध्यमिक शाळांची निवड करण्यात आली आहे.

 

ज्या शाळांमध्ये कार्यक्रम घेतला जाईल त्या शाळांना बापूसाहेब महाराजांची प्रतिमा छायाचित्र व जीवनचरित्र पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे. सदर व्याख्याने भरत गावडे (चौकुळ) हे देणार आहेत. उद्घाटन प्रसंगी त्याः त्या गावातील माजी सैनिकाना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले जाणार आहे.

 

या उपक्रमाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. आतापर्यंत २० शाळांत मार्गदर्शन करण्यात आले आहे. व्याखानाचा समारोप साटम महाराज वाचनालय, दाणोली येथे ४ जुलैला होणार आहे. गावागावात या होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष भरत गावडे व सहसचिव गजानन गावडे यांनी केले आहे.