सावंतवाडी प्रतिनिधी: तेरे खोल नदीपात्रात गाळ उपसा मोहीम सुरू आहे. हा गाळ उपसा संदर्भात आपण पाहणी केली आहे. पावसाळ्यात आंबोली, मळगाव, इन्सुली घाट बाबत योग्य दक्षता व उपाययोजना संदर्भात निश्चितच नियोजन केले जाईल. तर दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सोमवारी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत महिन्याचा आढावा समस्या अडचणी संदर्भात पत्रकारांशी संवाद चर्चा सत्रही घेतले जाईल. असे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पष्ट केले. तेरे खोल नदी पात्रातील गाळ उपसा मोहीम सुरू आहे. असेही ते म्हणाले सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची कायमस्वरूपी तहसीलदार पदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांशी संवाद कार्यक्रम केला. या अगोदर त्यांनी माडखोल धवडकी ते बांदा तेरेखोल नदीपात्रातील गाळ उपसा मोहिमेची पाहणी केली सदर मोहीम सुरू असून नदीपात्रातील गाळ उपसा संदर्भात त्यांनी आढावा घेतला.
त्यानंतर तहसीलदार कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आता सावंतवाडी तालुक्यात प्रत्येक गावनिहाय महसूल विभागीय शासन आपल्या दारी उपक्रम राबवणार आहो.त या अंतर्गत गावागावातील लोकांच्या समस्या अडचणी सोडवल्या जातील त्यांना तहसीलदार कार्यालयात कुठल्याही दाखल्यासाठी अथवा कुठल्याही माहितीसाठी येता येऊ नये या दृष्टीने मंडल विभागीय नुसार शासन आपल्या दारी आम्ही जाणार आहोत. त्याचे नियोजन तालुक्यात केले आहे. तसे लवकरच केले जाणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. आंबोली घाट मध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने कायमस्वरूपी यंत्रणा ठेवा तसेच गावातील स्थानिक तरुणांना २४ तास घाटातील उपाय योजनेसाठी तैनात करा व त्यांना त्यासाठी मानधनही द्या. तसेच मळगाव व इन्सुलिघाट सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करा. अशा सूचना पत्रकारांनी यावेळी मांडल्या. चौकूळ, कुंभवडे येथील धबधबा संदर्भात ही चर्चा करण्यात आली. त्या ठिकाणी येणार जाणारा पर्यटकांकडून धबधबा पाहण्यासाठी पैसे आकारण्यात येते. असे पत्रकारांनी स्पष्ट केले. यावर श्री पाटील यांनी संदर्भात काय करता येईल व दोडामार्ग तहसीलदारांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सूचित केले.
श्री पाटील म्हणाले पीएम किसान योजना संदर्भात आता नव्याने अध्यादेश जारी झाला आहे. त्यानुसार आता ही योजना कृषी विभागाकडे नोंदणी करायचे आहे .तरी ज्यांना पी एम किसान योजनेत लाभ घ्यायचा आहे. त्यांनी कागदपत्रासह आपली संपूर्ण माहिती द्यावी व जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .यावेळी सावंतवाडी शहर व तालुक्यातील पत्रकारांनी विविध प्रश्न उपस्थित केले यावेळी तालुक्यातील पत्रकार व अधिकारी यांच्यात योग्य सुसंवाद राहावा यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सोमवारी पत्रकार संवाद चर्चासत्र ठेवण्याचे स्पष्ट केले सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात असा उपक्रम राबविण्यात येईल असेही ते म्हणाले तसेच स्पर्धा परीक्षा साठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात दर आठवड्याच्या रविवारी उपक्रम राबविण्यात येईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार अखिल मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदारॲड संतोष सावंत, माजी तालुकाध्यक्ष विजय देसाई, राजेश मोडकर, प्रवीण मांजरेकर, तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, उपाध्यक्ष दीपक गावकर, उमेश सावंत, अनिल भिसे, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, सोशल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, सचिन रेडकर, राजू तावडे, अरुण भिसे, जतीन भिसे, रुपेश हिराप, निखिल माळकर, सिद्धेश सावंत, नरेंद्र देशपांडे, राजाराम धुरी, प्रसन्न गोंदवले, शुभम धुरी, भुवन नाईक, नितेश देसाई आधी उपस्थित होते.
फोटो: सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करताना गजानन नाईक, ॲड संतोष सावंत, विजय देसाई, सचिन रेडकर, बाजूला अनंत जाधव, अमोल टेमकर, राजू तावडे, दीपक गावकर, उमेश सावंत, अनिल भिसे, अरुण भिसे, जतिन भिसे, रुपेश हिराप आधी. छाया भारत फोटो स्टुडिओ