Home शिक्षण सावंतवाडी तालुक्यातील राणी पार्वती देवी हायस्कूल येथे विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा उत्साहात...

सावंतवाडी तालुक्यातील राणी पार्वती देवी हायस्कूल येथे विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न.

205

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सावंतवाडी तालुक्यातील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या भव्य सभागृहात पार पडली. याप्रसंगी सावंतवाडी शहराच्या प्रथम नागरिक माननीय श्रद्धा राजे भोसले नगराध्यक्षा नगरपालिका सावंतवाडी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे वृंदा कांबळी सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, डॉक्टर शरयू आसोलकर, श्री वामन पंडित, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य महादेव देसाई, त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती वर्षा देवरुखकर संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यादेखील उपस्थित राहून उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला सावंतवाडी तालुक्यातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांबरोबरच काही साहित्यप्रेमींनी देखील उपस्थिती दर्शवली.

उपस्थितीत मान्यवर

याप्रसंगी बोलतांना माननीय नगराध्यक्ष यांनी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यक्रमांना शुभेच्छा देताना संबंधित कार्यक्रमांसाठी आपण नेहमीच सहकार्य करू. असे देखील सांगितले. त्याचप्रमाणे आपण मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे. त्यासाठी चे प्रयत्न करीत आहात. त्यासाठी आपण शुभेच्छा देश असल्याबद्दल त्यांनी नमूद केले. तसेच मराठी भाषा मंडळाचे सदस्य भरत गावडे सर यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी भाषा मंच सावंतवाडी मध्ये स्थापन करणे, याबाबत सुतोवाच केले. आहे. त्यासाठी देखील सन्माननीय नगराध्यक्ष यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मराठी भाषा जोपासणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रतिबद्ध असले पाहिजे. असे प्रतिपादन म.ल देसाई सर यांनी केले. या कार्यक्रमाला सावंतवाडी चे नवनियुक्त नगरसेवक प्रतीक बांदेकर तसेच सुधीर आडीवरेकर यांनी देखील सदिच्छा भेट दिली व सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात बोलतांना सावंतवाडी नगराध्यक्ष

कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडी चे अध्यक्ष श्री विजय भिवा गावडे हेदेखील उपस्थित होते. तसेच आरपीडी प्रशालेच्या मुख्याध्यापिका कशाळीकर मॅडम त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मराठी भाषा मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर परब यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय गावडे यांनी केले.