सावंतवाडी प्रतिनिधी: समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रम व जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय शिक्षा समागम अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला ५ वर्षपूर्ती निमित्त दिव्यांग मुलांसाठी तालुकास्तरीय कॅम्प दिनांक ३० जुलै २०२५ रोजी यु. डी. आय. डी. रजिस्ट्रेशन कॅम्प, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी स्पीच थेरेपी कॅम्प दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी दृष्टीदोष तपासणी कॅम्प इत्यादी तालुकास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन व उपचारात्मक शिबिरांचे आयोजन करण्यात आले.या मूल्यांकन व उपचारात्मक शिबिरामध्ये यु. डी. आय. डी. रजिस्ट्रेशन चा लाभ ०९ विद्यार्थ्यांनी घेतला. स्पीच थेरेपीचा लाभ १२ विद्यार्थ्यांनी घेतला व दृष्टीदोष शिबिराचा लाभ २३ विद्यार्थ्यांनी घेतला.
ही शिबिरे पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मा. श्रीमती सविता परब मॅडम उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी चे वैद्यकीय अधीक्षक मा श्री. ज्ञानेश्वर ऐवळे सर, गट साधन केंद्र सावंतवाडी चे गट समन्वयक मा. श्री. कमलाकर ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांचे सर्व कामकाज NRHM सावंतवाडीचे सर्व डॉक्टर व कर्मचारी, तसेच गटसाधन केंद्र सावंतवाडीचे विशेषतज्ञ व विशेष शिक्षक यांनी केले. एकंदरीत सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त गरजा धिष्ठित विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घेतला.