Home स्टोरी सावंतवाडी एज्युकेशनच्या मुलांनी केले वृक्षारोपण!

सावंतवाडी एज्युकेशनच्या मुलांनी केले वृक्षारोपण!

339

सावंतवाडी प्रतिनिधी:

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…… या काव्यपंक्ती संत तुकाराम महाराजांनी अगदी पूर्वीच्या काळी म्हणून ठेवल्या आहेत. आणि त्याची प्रचिती आज आपल्याला येते आहे. प्रचंड वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे कधी कधी कडक उन्हाळा, प्रचंड पाऊस किंवा अवर्षण, दुष्काळ, पर्यावरणीय असमतोल अशी परिस्थिती निर्माण होते आहे. आजच्या पिढीला वृक्ष लागवड करा. असे सांगावे लागते आहे. मात्र आमच्या सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडीतील प्रसिद्ध नरेंद्र डोंगरावर आज वृक्षारोपण व बीजारोपण केले.

वृक्षारोपण करतांना शाळेतील मुले

यामध्ये प्राथमिक शाळेच्या मुलांनी आंबा, फणस, काजू, जांभूळ ,पेरू,पपई किंवा अन्य रानटी वृक्षांची लागवड केली. तसेच विविध बियांचे बीजारोपण केले. यावेळी झाडांचे महत्त्व मुलांना पटवून देण्यात आले. प्रत्येक मुलाने एक रोप किंवा काही बिया आणल्या होत्या. आणि प्रत्येक मूल आपण झाड लावत आहोत याची अनुभूती घेत होते.

वृक्षारोपण करतांना शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या या उपक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. सावंत सर ,शिक्षक श्री डि.जी. वरक,अमित कांबळे,ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ, श्रीमती घाडीगावकर, श्रीमती संजना आडेलकर आदी शिक्षक उपस्थित होते.