Home स्टोरी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला जागरूक नागरिक सत्य पडताळणीसाठी विविध बाबींची तपासणी करणार.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला जागरूक नागरिक सत्य पडताळणीसाठी विविध बाबींची तपासणी करणार.

78

सावंतवाडी प्रतिनिधी: मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला (काॅटेज हाॅस्पिटलला) सावंतवाडी आणि परिसरातील जागरूक नागरिक विविध बाबींची तपासणी करण्यासाठी भेट देणार आहेत. कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सदर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेच्या उडालेल्या बोजवारा संदर्भात दाखल केलेल्या अभिनव फाउंडेशन या संस्थेच्या जनहित याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेंतर्गत दुरावस्थे संबंधित एक सत्य पडताळणी(फॅक्ट फाइंडिंग कमिटी)समिती नेमलेली आहे.

 

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एक सक्षम अतिदक्षता विभाग असून दोन फिजिशियन डॉक्टर्स दिवसरात्र कार्यरत आहेत तसेच ट्राॅमा केअर युनिट कार्यरत असून अनेक अपघात झालेल्या रुग्णांना आणि तातडीची सेवा उपलब्ध आहे,अशी माहिती आरोग्य विभागातर्फे माननीय उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली आहे. तरीही सावंतवाडी आणि परिसरातील नागरिक मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहून सत्य परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आपण आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन अभिनव फाउंडेशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.