Home स्टोरी सावंतवाडीत ३० सप्टेंबर रोजी बजरंग दलातर्फे ‘शिवशौर्य’ यात्रेचे आयोजन

सावंतवाडीत ३० सप्टेंबर रोजी बजरंग दलातर्फे ‘शिवशौर्य’ यात्रेचे आयोजन

126

सावंतवाडी: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. या प्रसंगास सन २०२३-२४ या वर्षात ३५० वर्ष पूर्ण होत आहेत.

 

विश्व हिंदू परिषदेलाही ६० वर्ष पूर्ण होत आहेत. हा सुवर्णयोग साधून ३० सप्टेंबर रोजी सावंतवाडीत विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे ‘शिवशौर्य’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या बाबतची माहिती शहर यात्रा प्रमुख तथा बजरंग दल संयोजक गौरव शंकरदास यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी धर्मप्रसार प्रमुख सुनील सावंत, कोषाध्यक्ष रवी सातवळेकर, सह कोषाध्यक्ष विनायक रांगणेकर तसेच प्रसिद्धी प्रमुख किशोर चिटणीस आदी उपस्थित होते.

 

शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता दोडामार्ग येथे यात्रेस सुरुवात होईल. सकाळी ११ वाजता टोपीवाला तांत्रिक महाविद्यालय पोलीस लाईन सावंतवाडी येथे यात्रेचे आगमन होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक परकीय आक्रमकांच्या तावडीतून प्रदेशाला सोडवून स्वराज्याची निर्मिती केली. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला.

 

छत्रपती समरस, सुसंघटीत हिंदू समाजाची निर्मिती करणे, आपला सांस्कृतिक वारसा आणि जीवन मूल्यांचे संरक्षण, संवर्धन करणे, अन्य धर्मात गेलेल्या परंतु हिंदू जीवन पद्धतीबद्दल आस्था असणाऱ्या बंधू भगिनींना हिंदू धर्मात आणणे, गरीब, उपेक्षित वनवासी गीरीवासी, शहरवासी बंधू भगिनींची सेवा करणे या व इतर उद्देशाने १९६४ साली श्रीकृष्णजन्माष्टमीस पूज्य संत धर्माचार्य आणि दार्शनिकांच्या मंथनातून विश्व हिंदू परिषदेचा जन्म झाला.

 

आज जगातील १२५ देशांतील हिंदू समाजाशी संपर्क प्रस्थापित करण्यात परिषदेला यश मिळाले आहे. यंदा विश्व हिंदू परिषदेलाही ६० वर्ष पूर्ण होत आहेत. हा सुवर्णयोग साधून विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे ‘शिवशौर्य’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता दोडामार्ग येथे यात्रेस सुरुवात होईल. सकाळी ११ वाजता टोपीवाला तांत्रिक महाविद्यालय (पोलीस लाईन) सावंतवाडी येथे यात्रेचे आगमन होईल. तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

सावंतवाडीतील नियोजित यात्रेचा कार्यक्रम:

 

सकाळी ११.०० वाजता टोपीवाला तांत्रिक महाविद्यालय (पोलीस लाईन), सावंतवाडी येथे यात्रेचे आगमन व आदरणीय बाळ राजे यांच्या शुभ हस्ते स्वागत, यात्रा मार्ग (दर्शन थांबे) शिरोडा नाका- मिलाग्रीस हायस्कूल- जयप्रकाश चौक- गांधी चौक (कॉर्नर सभा)- रामेश्वर प्लाझा भोसले उद्यान राजवाडा येथे सांगता समारोह होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.