Home स्टोरी सावंतवाडीत श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

सावंतवाडीत श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

154

सावंतवाडी: सावंतवाडी तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी कोलगाव चव्हाटा नजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तर उद्घाटक म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्त सकाळी ९ वाजता विश्वकर्मा पूजन, सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन, दुपारी १२:३० वाजता विद्यार्थ्यांचा गुणगौरव दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता हळदी कुंकू, सायंकाळी ४ वाजता विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता माऊली दशावतार मंडळा (इन्सुली ) चे नाटक होणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विश्वकर्मा सुतार मंडळाचे अध्यक्ष शंकर मेस्त्री, सचिव अमीदी मेस्त्री, खजिनदार संतोष मेस्त्री यांनी केले आहे.