Home स्टोरी सावंतवाडीत लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात!

सावंतवाडीत लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात!

119

सावंतवाडी प्रतिनिधी: आज पाचव्या दिवशी इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या विघ्नंहत्यार्ला सावंतवाडी शहरात गणेश भक्त निरोप देत आहेत. संध्याकाळी ६ वाजल्यापासून सावंतवाडी मोती तलाव येथे गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने सावंतवाडी शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’,अशा जयघोषात बाप्पाला भाविक आज श्रध्देने निरोप देत आहेत. गणपती विसर्जन बघण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक सावंतवाडी मोती तलाव येते उपस्थित आहेत.

A

गणपती विसर्जनासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी गणपती विसर्जनासाठी सर्व प्रकारे मदत करत आहेत.  पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सावंतवाडी तालुक्यात शांततेत पार पडत आहे.