Home स्टोरी सावंतवाडीतील च्यापेल गल्ली येथील रहिवासी गीतांजली मिस्त्री माहिलेला सामाजिक बांधिलकीची साथ!

सावंतवाडीतील च्यापेल गल्ली येथील रहिवासी गीतांजली मिस्त्री माहिलेला सामाजिक बांधिलकीची साथ!

107

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी गणपती मंदिर मागील च्यापेल गल्ली येथील रहिवासी गीतांजली मिस्त्री वय वर्ष ५४ ही गेले दोन-तीन दिवस अत्यंत आजारी अवस्थेत राहत्या घरात पडली होती. चुकीच्या पद्धतीने गोळ्या घेतल्यामुळे रिएक्शन होऊन अंगाला पूर्णपणे सूज आल्याने सिरीयस झाली होती. नवरा अंध असल्यामुळे हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी काहीच हालचाल करू शकला नव्हता. याची माहिती युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व अनिकेत धुरी यांनी थेट सामाजिक बांधिलकीशी संपर्क साधून सदर पेशंटला मदत करण्याचे सांगितले असता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपाली मुद्राळे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व सामाजिक कार्यकर्ते हेमंत वागळे व लक्ष्मण शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते त्वरित ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सहकार्याने व अनिकेत सुकी यांच्या मदतीने सदर रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आले. सदर पेशंटची ऑक्सिजन लेवल अत्यंत कमी असल्यामुळे तिला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार डॉ. अमरापूरकर व डॉ. हेडगे करत आहेत. सदर पेशंटच्या नातेवाईकांचा अद्यापही पत्ता लागू शकला नाही . तोपर्यंत त्या पेशंटला औषध उपचारासाठी होणाऱ्या खर्चासहित त्या पेशंटची जबाबदारी सामाजिक बांधिलकीने स्वीकारली आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एक महत्त्वाचं आव्हान करण्यात येत आहे की अशा पद्धतीचे पेशंट आपल्या आजूबाजूला आजारी किंवा अचानक सिरीयस झाले असल्यास त्यांनी थेट सामाजिक बांधिलकीशी संपर्क साधावा. जेणेकरून अशा पेशंटवर वेळीच उपचार करता येईल आणि त्यांचा जीव वाचेल.