सावंतवाडी: येथील ख्रिस्ती धर्म प्रसारक तथा फातिमा संस्थेच्या सिस्टर्स मिलाग्रीन डान्टस वय – वर्ष ५९. रा. भटवाडी, यांचे आसाम-शिलाँग येथे अपघाती निधन झाले. ट्रक आणि चार चाकी यांच्यात धडक होऊन हा अपघात घडला. यात मृतांमध्ये एक फादर, तीन सिस्टर, आणि दोघा शिक्षकांचा समावेश आहे. डान्स या येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या माजी विद्यार्थी होत्या. त्यांच्या अकाली निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.