सावंतवाडी प्रतिनिधी: बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज मुंबई, बेस्ट शिव हनुमान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय मानाच्या सिंधुदुर्ग स्त्री 2025 या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. त्यामध्ये टीम शिवाजी व्यायामशाळा सावंतवाडीचा रामदास राजन राऊळ हा मानाच्या सिंधुदुर्ग श्री २०२५ चा मानकरी ठरला. या स्पर्धेमध्ये मोस्ट इम्प्रूव्ह म्हणून सरवसे फिटनेस, कणकवलीच्या शांताराम गोडकर याची निवड करण्यात आली, तर बेस्ट पोजर म्हणून फ्युचर जिमच्या शुभम तेलीची निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात येणारी सिंधुदुर्ग श्री शरीर सौष्ठव स्पर्धा मामा वरेकर नाट्यगृह मालवण येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन मालवणचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक श्री संदीप उर्फ बाबा परब, बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री नंदकुमार राणे, उपाध्यक्ष श्री ओमप्रकाश सिंग, विश्वस्त श्री सतीश राणे, श्री सुनील सिंग, बेस्ट शिव-हनुमान व्यायाम शाळा, कांदळगावचेअध्यक्ष श्री उमेश कोदे, सचिव श्री प्रवीण पारकर, खजिनदार श्री महेश परब,आंतरराष्ट्रीय पंच श्री रामकृष्ण चितळे, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पंच श्री विजय मोरे, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय पंच तथा सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सचिव श्री किशोर सोनसुरकर, माजी नगराध्यक्ष श्री महेश कांदळगावकर, क्रीडा समन्वयक श्री अजय शिंदे, श्री संतोष लुडूबे, वायरी, कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य विहार कोदे, सत्कार कोदे, नगर वाचन मंदिर चे ग्रंथपाल श्री संजय शिंदे, श्री अजय मुणगेकर, श्री गणेश सातार्डेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॉडी बिल्डर्स स्पर्धेची पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल श्री विक्रांत विठ्ठल गाड,श्री अमोल विजय तांडेल, श्री सुधीर रमाकांत हळदणकर, श्री हेमंत काशिनाथ नाईक, श्री अंकित किशोर सोनसुरकर श्री सौरभ वारंग यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :-
५५ किलो वजनी गट, प्रथम- पराग बोंद्रे, टीम शिवाजी, सावंतवाडी द्वितीय-शेखर चव्हाण, जिम टाऊन फिटनेस, कडावल, तृतीय- संकेत भगत, सोनसुरकर फिटनेस, शिरोडा,चतुर्थ- भूषण गवंडी, सोनसुरकर फिटनेस, शिरोडा, पाचवा- नेहान नाईक, बीस्ट जोकर, जिम सावंतवाडी.
६० किलो वजनी गट, प्रथम- विपुल करलकर गिअर आप जिम, कुडाळ, द्वितीय-शेरबहादुर बोगटी, जोकर फिटनेस सावंतवाडी, तृतीय- दीप भोगले, सरवंजे जिम,फोंडा, चतुर्थ- प्रथमेश गावकर, नगरपालिका जीम, मालवण, आदित्य पालव इनफिनिटी जिम, कुडाळ.
६५ किलो वजनी गट, प्रथम- शांताराम गोडकर सरवंजे फिटनेस, कणकवली, द्वितीय- सागर काळप, गिअर अब जिम, कुडाळ, तृतीय-प्रथमेश कातळकर, कातळकर जिम, मळगाव, चतुर्थ- ईश्वर मामलेकर, त्यागी फिटनेस, सावंतवाडी, पाचवा- वेदांत केरकर बी स्ट्रॉंग जिम, बांदा.
७० किलो वजनी गट, प्रथम- बाळा नार्वेकर, एम्पायर जिम, कुडाळ द्वितीय- सागर लटम, गिअर अप जिम,कुडाळ, तृतीय- अदनान कशेल, गिअर अप जिम, कुडाळ, चतुर्थ- रोशन चोपडेकर, नगरपालिका जीम मालवण, पाचवा- प्रतीक भोगले, मसल क्रिएशन आचरा.
७० किलो वरील वजनी गट, प्रथम-रामदास राजन राहुल, टीम शिवाजी सावंतवाडी, द्वितीय- राहुल आडारकर, प्रो फिटनेस जिम, वेंगुर्ला, तृतीय- सलमान त्यागी, त्यागी फिटनेस सावंतवाडी, चतुर्थ- देवेश लाड, रॉयल फिट जिम, फोंडा, पाचवा- महादेव पंदारे, गियरब जिम कुडाळ.
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते या स्पर्धेत सहभागी झालेले ६५ वर्षे वयाचे कणकवली येथील शरीर सौष्ठवपटू श्री.महेश वाळके यांचे. तरुणांना प्रेरणास्थान ठरलेले श्री वाळके यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक तसेच गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करून पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माननीय आमदार डॉ. निलेशजी राणे,सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक श्री संदीप उर्फ बाबा परब, मे.अनिल भालचंद्र धारगळकर ज्वेलर्स, मालवणचे मालक श्री प्रसाद अनिल धारगळकर तसेच मालवण नगरपरिषद यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण पारकर तर आभार श्री.आशिष आचरेकर यांनी मानले.