सावंतवाडी प्रतिनिधी: साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स तर्फे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वृक्ष संवर्धन व जतन असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आगळ्यावेगळ्या पद्धतीने या कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंट च्या मुलांनी एक झाड लावून त्या झाडाला संरक्षणाच्या दृष्टीने राखी बांधून हे झाड मी जतन व संवर्धन करणार अशी शपथ घेतली. या शाळेतील जवळपास दीडशे विद्यार्थी आज पासून ज्या झाडाला राखी बांधली त्या वृक्षाची निगा व देखभाल करणार आहेत. असा अनोखा उपक्रम राबवून वृक्ष लागवड पेक्षा वृक्ष संवर्धन व जतन व त्याची निगा राखणे हे महत्त्वाचे आहे असा संदेश यातून दिला आहे.

यावेळी पर्यावरण व वृक्ष संवर्धन व आजच्या काळातील सामाजिक बदल या विषयी मार्गदर्शन प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना तरुण भारत संवाद चे तालुका प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत यांनी आज पासून आपण सर्वांनी एकच प्रतिज्ञा करायला हवी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष संवर्धन व जतन साठी ज्या उपायोजना केल्या अन वृक्षतोड बंदी केली. त्या शिवरायांचे विचार आचार घेऊन आपण आजच्या तरुणांनी महाविद्यालयीन जीवनातच कृत्रिम बुद्धिमत्ते बरोबर नैसर्गिक साधन संपत्ती चा अभ्यास करून आपण प्रगल्भ व्हायला हवे आणि आज पासून आम्ही एक तरी वृक्ष संवर्धन व जतन करून एक नवीन ऊर्जा यातून निर्माण करू अशी प्रतिज्ञा करा. यातून जीवन निश्चितच सुखकारक आणि यशस्वी होईल. असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण कुमार प्रभू केळुसकर यांनी कोकणात भरभरून नैसर्गिक संपत्ती आहे. परंतु या कोकणात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जय हिंद कॉलेजने असा संकल्प केला आहे. या कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थी एक तरी झाड संवर्धन व जतन करून त्याची निगा राखील. यातून या विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा धडा देण्याचा आमचा मानस आहे. असे विविध उपक्रम या महाविद्यालयाच्या माध्यमातून घेतले जातील विद्यार्थ्यांनी वृक्षाला आपला भाऊ मानून रक्षाबंधन निमित्ताने वृक्षाचे संवर्धन व जतन करण्याच्या घेतलेला निर्णय स्तुत्य आहे.
यावेळी बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मयूर शार बिद्रे यांनी आज वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. पशुपक्षी प्राणी वस्तीत येत आहेत. याला आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे त्यांना खाद्य असणारे वृक्ष लागवड आपण करायला हवी. असे ते म्हणाले. यावेळी वृक्षदिंडी काढण्यात आली व संपूर्ण गावात जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित यांचे स्वागत प्राचार्य अमेय महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद धुरी तर उपस्थितांचे आभार मनाली सावंत यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.







