Home क्राईम सायबर गुन्ह्यापासून सावध रहा!वेंगुर्ला पोलिसांचा इशारा….

सायबर गुन्ह्यापासून सावध रहा!वेंगुर्ला पोलिसांचा इशारा….

174

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गुन्हयाच्याकामी आरोपीत जावेद ताजुददीन मकानदार, वय ३६ वर्षे, रा. पिराचा दर्गा, ता. वेंगुर्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.*वेंगुर्ले:- वेंगुर्ला शहरात दिल्ली येथील अल्पवयीन मुलगी वय १४ वर्षे, रा. जहांगीरीपुरी, ही दिल्ली येथून घरात कोणासही न सांगता तिचा वेंगुर्ला येथील इंस्टाग्राम वरील मित्र जावेद मकानदार, रा. पिराचा दर्गा, ता. वेंगुर्ला याचेकडे राहणे करीता आलेली होती. त्याबाबत माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांनी अल्पवयीन मुलगी हिच्याकडे चौकशी केली. त्यावरून ती दिल्ली येथून घरातून निघून आल्याबाबत व नॉर्थ वेस्ट दिल्ली जहांगीरपुरी गु. र. नं. ४८९/२०२३ भा. द. वि. क. ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याबाबत दिल्ली पोलीस तपास करीत असल्याचे समजून आलेले होते.त्यामुळे सदर अल्पवयीन मुलीची काल दिनांक ३०/०६/२०२३ रोजी वैदयकिय तपासणी करुन तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने अंकुर केंद्र सावंतवाडी येथे ठेवण्यात आले आहे.आज दिनांक ०१/०७/२०२३ रोजी दिल्ली पोलीस यांच्याशी संपर्क कळल्यावर वरील गुन्हयाच्या तपासाअनुषंगाने दिल्ली पोलीस वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आल्याने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्या मदतीने दिल्ली पोलिसानी सदर गुन्हयाच्याकामी आरोपीत जावेद ताजुददीन मकानदार, वय ३६ वर्षे, रा. पिराचा दर्गा, ता. वेंगुर्ला याला ताब्यात घेतलेले आहे. तसेच अंकुर येथे ठेवण्यात आलेल्या त्या अल्पवयीन मुलीस वेंगुर्ला पोलिसानी दिल्ली पोलिसाना ताब्यात दिलेले आहे.दिल्ली पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्याकामी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री. अतुल जाधव , यांच्या मार्गदर्शनाखाली सपौफो/766 कुबल, मपोहवा/13 चौहान, मपोकॉ/286 भाटे, पोहवा /1005 सुरेश पाटील यांनी काम केले.