Home स्टोरी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने शिरोडा येथील निराधार उद्धाला जिव्हाळा सेवाश्रमाचा आधार.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने शिरोडा येथील निराधार उद्धाला जिव्हाळा सेवाश्रमाचा आधार.

133

सावंतवाडी (रवी जाधव): या देशात आश्रम आणि सामाजिक संस्था नसत्या तर या निराधार वृद्धांच काय झालं असतं? हा एक गंभीर प्रश्न आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज कित्येक निराधार वृद्धांना आश्रमत आश्रम मिळून दिला पण असा आश्रय मिळवून देताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून आमचेही डोळे पाणावतात असे भावूक उद्गार रवी जाधव यांनी काढले.

चार दिवसापूर्वी एका निराधार उद्धाला तर कालच शिरोडा व माजगाव सावंतवाडी येथे निराधार वृद्धाला आश्रय मिळवून दिला. भालचंद्र शिरोडकर वय वर्ष 65 यांना मुलं नसल्याने पत्नीच्या निधनानंतर ते पूर्णपणे अनाथ झाले. ते माजगाव येथील एका पाईप कंपनीमध्ये काम करत होते.
माजगाव येथील दुकानदार सुरेश मांजरेकर यांच्याशी त्यांची जुनी मैत्री होती त्यांच्या दुकानात ते नेहमी बसायचे परंतु काही वर्षांपूर्वी सुरेश मांजरेकर यांचे निधन झाले आणि त्यांच्या तोही आधार हरपला.
मागील दोन वर्षांपूर्वी वृद्धपणाने त्यांचे कामही सुटले त्यानंतर ते इकडे तिकडे भटकू लागले या परिस्थितीत त्यांचे खूप हाल झाले अखेर नाईलाज म्हणून ते पुन्हा आपले मित्र मांजरेकर यांच्या घरी आले व त्यांच्या मुलीला विनंती केली काही दिवस मला येथे थांबू द्या अन्यथा मला कुठच्यातरी आश्रम मध्ये भरती करा. आपल्या वडिलांचे मित्र म्हणून व त्यांच्या विनंतीला मान देऊन मांजरेकर यांच्या मुलीने एक महिना त्यांना आपल्या घरात आश्रय दिला व त्यांच्या इच्छेनुसार आश्रमा आश्रय देण्याकरिता ती प्रयत्न करू लागली अशावेळी सामाजिक कार्यकर्ते उमा वारंग यांनी रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला व सदर परिस्थिती जाणविधी करून दिली. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या हेलन निबरे व रूपा गौंडर (मुद्राळे) यांनी पुढाकार घेऊन रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम ते आश्रय घेत असलेल्या घरी गेले त्यावेळी त्यांनी सर्व हकीकत सांगितली “जवळचे खूप आहे पण म्हातारपणी मला साथ देणारा असा कोणी नाही मी फार दमलो आता हात पाय काम करत नाहीत मला कुठच्यातरी आश्रम मध्ये टाका मांजरेकर कुटुंबाचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत त्यांना अजून त्रास देणे योग्य वाटत नाही काहीतरी करा माझ्यासाठी तुमचे फार उपकार होतील.”
त्यांचे हे शब्द मन हेलावून टाकणारे होते. त्यांच्याजवळ साधे कपडे पण नव्हते सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान माध्यमातून त्यांना नवीन कपडे घेऊन देण्यात आले तसेच हात-पाय दुखी आजारपणावर रूपा गौंडर ( मुद्राळे ) यांनी त्यांच्यावर डॉक्टर उपचार करून औषध गोळ्यांची व्यवस्था केली आणि काल संध्याकाळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव,हेलन निबरे व लक्ष्मण कदम यांच्या सहकार्याने त्यांना कुडाळ पिंगुळी माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाआश्रम मध्ये भरती करण्यात आले.
आज ही परिस्थिती आहे अशा वृद्ध माणसांची पुढे काय होईल सांगता येत नाही. आपलेच जर असेच परके झाले तर म्हातारपणी काय कराव या माणसांनी जगावं की मरावं हाच एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.