Home स्टोरी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून पाच टी.बी रुग्ण दत्तक…! रवी जाधव.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून पाच टी.बी रुग्ण दत्तक…! रवी जाधव.

26

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निकष मित्रा अंतर्गत प्रधानमंत्री टी.बी मुक्त भारत अभियान यशस्वीपणे राबवण्याकरिता या संस्थेकडून पाच टी. बी रुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्ण हा समाजसेवेचा केंद्रबिंदू मानून रुग्णांसाठी दिवस-रात्र सेवा या संस्थेच्या माध्यमातून पुरवली जाते. याच गोष्टीचा आढावा घेऊन आरोग्य विभागाचे ए एम मोरस्कर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान समोर सदर प्रस्ताव ठेवला होता. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांनी लगेच त्या प्रस्तावाला होकार दिला आणि आज रोजी पाच टी.बी रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. उपस्थित डॉक्टर व रुग्णांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले व आभार मानले.

याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे, डॉ. हर्षल जाधव जिल्हा क्षयरोग अधिकारी सिंधुदुर्ग, डॉ.रमेश कर्तसकर तालुका आरोग्य अधिकारी सावंतवाडी, श्री रमेश परब जिल्हा पर्यवेक्षक, श्री एम ए मोरजकर जिल्हा पी पी एम समन्वयक, श्री अभिजीत टिळवे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक श्री स्वप्निल गवय, वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक, तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे रूपा गौंडर ( मुद्राळे),शरदीनी बागवे, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.